पाटोदा तालुक्यात घरगुती गॅसची अडवणूक करणाऱ्या एजन्सींवर तात्काळ कारवाई करा – संतोष कवठेकर


पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही काही गॅस एजन्सीकडून नागरिकांना वेळेवर गॅस देण्यात अडचणी निर्माण केल्या जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. घरगुती गॅस उपलब्ध असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून ग्राहकांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष कवठेकर यांनी प्रशासनाकडे लक्ष वेधत संबंधित गॅस एजन्सींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, घरगुती वापरासाठी असलेला गॅस नागरिकांना सहज उपलब्ध व्हावा, ही एजन्सीची जबाबदारी आहे. मात्र काही ठिकाणी सिलेंडर उपलब्ध असूनही ग्राहकांना विलंब केला जातो किंवा विविध कारणे सांगून अडवणूक केली जाते.यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषी एजन्सींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संतोष कवठेकर यांनी केली आहे. तसेच पाटोदा तालुक्यातील सर्व गॅस एजन्सींची तपासणी करून नागरिकांना घरगुती गॅस सुरळीतपणे मिळावा, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी