रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची मुंबईत भेट; पुरुषोत्तम (गोटू )वीर यांना लवकरच मोठी जबाबदारी?
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची मुंबईत भेट; पुरुषोत्तम (गोटू )वीर यांना लवकरच मोठी जबाबदारी?
मुंबई (प्रतिनिधी) – राजगृहाशी एकनिष्ठ राहून सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असलेले पुरुषोत्तम (गोटू )वीर यांनी आज मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात येये रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान पक्षाचे नेते विजय साळवे यांच्या उपस्थितीत पक्ष संघटन अधिक मजबूत करणे, पक्षाचा विस्तार वाढवणे तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात विविध विषयांवर सकारात्मक संवाद झाला. तसेच पुरुषोत्तम वीर यांना लवकरच रिपब्लिकन सेनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा देखील या बैठकीत झाली.
या प्रसंगी लक्ष्मण गव्हाणे, अशोक वाघमारे, बी. एस. जगतकर यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment