शिवसेनेच्या वतीने शिरूर कासार तालुक्यात मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा
शिवसेनेच्या वतीने शिरूर कासार तालुक्यात मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा
तालुकाप्रमुख/ उपजिल्हाप्रमुखांनी घेतली मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन गळाभेट-
शिरखुर्मा अन् गुलगुले पदार्थांचा घेतला आस्वाद
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे) :
पवित्र रमजान ईदनिमित्त शिरूर कासार तालुक्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असुन याच उत्साहात भर घालत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या असुन शिवसेना तालुकाप्रमुखांनी आपल्या सहकाऱ्यांसह कारेगाव, जाटनांदूर, वारणी यांसह तालुक्यातील अनेक गावांत भेटी देऊन सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.
शिरखुर्मा अन् गुलगुले यांचा आस्वाद--
तालुकाप्रमुख या नात्याने तालुक्यातील मुस्लिम बांधव आणि मित्रपरिवाराच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांची गळाभेटी घेऊन पारंपरिक शिरखुर्मा आणि गुलगुले या पदार्थांचा आस्वाद घेत, मुस्लिम बांधवांच्या प्रेमळ आदरातिथ्याचा स्वीकार करण्यात आला. ग्रामीण भागातील ही जुनी संस्कृती जोपासत यावेळी अत्यंत मोकळ्या वातावरणात गप्पा रंगल्या.
प्रमुख उपस्थिती
या सदिच्छा भेटींदरम्यान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिनाभाऊ खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने मित्र परिवार उपस्थित होता. प्रत्येक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी या भेटींचे स्वागत केले.
"राजकारणापलीकडे जाऊन आपली सामाजिक वीण घट्ट करणे हाच आमचा उद्देश आहे. आज कारेगाव, जाटनांदूर, वारणी या भागातील आपल्या मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन जो आनंद मिळाला, तो शब्दांत मांडता येणार नाही. हा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येवो, शुभेच्छा शिवसेना तालुकाप्रमुख, सोपान ( काका) मोरे/ शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ )खेडकर शिरूर कासार यांनी याप्रसंगी दिल्या .
या उपक्रमामुळे शिरूर कासार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे .
Comments
Post a Comment