मेरा युवा भारत अंतर्गत विमला शाळेत निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन

          गेवराई प्रतिनिधी : मेरा युवा भारत योजने अंतर्गत रंगार चौक, गेवराई येथील विमला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन सत्यजित संतोष, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत यांनी केले. प्रमुख उपस्थितीत प्रकाश त्रिभुवन (जिल्हा समन्वयक, मेरा युवा भारत, छत्रपती संभाजीनगर), कडुदास कांबळे (प्रदेश समन्वयक, महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समिती), पांडुरंग खरात (गेवराई तालुका समन्वयक, मेरा युवा भारत) व निलेश त्रिभुवन (सामाजिक कार्यकर्ते, छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश होता. 
            या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य मुख्याध्यापक श्री. जोगदंड के. जी. यांचे राहिले. या निबंध स्पर्धेचे विषय होते - १) सुभाषचंद्र बोस, २) विजयी दिवस, ३) माझ्या स्वप्नातील भारत. ८वी व ९वी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. 
       कडुदास कांबळे (महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे प्रदेश समन्वयक) या कार्यक्रमात मार्गदर्शन करत असताना त्यांनी निबंध स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले. "विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास व्हावा यासाठी अशा स्पर्धा अत्यंत गरजेच्या आहेत," असे ते म्हणाले.
          बक्षीस वितरणानंतर जिल्हा समन्वयक प्रकाश त्रिभुवन यांनी नेहरू युवा केंद्राचे 'मेरा युवा भारत' केंद्रात नामांतर झाल्याचे सांगितले. मेरा युवा भारत केंद्राच्या माध्यमातून होणाऱ्या विविध सामाजिक स्पर्धा व उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली. "यापुढेही विमला विद्यालयातील विद्यार्थ्यांना कलागुण विकसित करण्यासाठी स्पर्धांच्या संधी उपलब्ध करून देऊ," असे त्यांनी घोषित केले.
      निबंध स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांची यादी
८वी वर्ग : प्रथम : कु. काव्या अमोल कानपुरे
द्वितीय : कु. वेदिका सुदर्शन वाईकर
तृतीय : चि. वेद प्रमोद आमलेकर
९वी वर्ग : प्रथम : कु. ऋतिका लहू म्हेत्रे
द्वितीय : कु. गौरी दादासाहेब खडके
तृतीय : कु. ऋतिका सुदर्शन खुणे
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र कुलकर्णी सर यांनी केले. मुख्याध्यापक श्री. जोगदंड के. जी. यांनी समारोपात मेरा युवा भारत केंद्राचे आभार मानले तसेच भविष्यातील संधींची अपेक्षा व्यक्त केली. परीक्षक म्हणून श्रीमती जवंजाळ के. एस., श्री. जिरेवाड सुनील मारुतीराव व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती घुगे एस. एस. यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थी, शिक्षक व पालकांची मोठी उपस्थिती लाभली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी