दुःखद निधन: अंबादास हरीभाऊ वाघमारे यांचे अल्पशा आजाराने निधन
बीड प्रतिनिधी : पंचशील नगर येथील रहिवासी आणि राहुल वाघमारे यांचे वडील अंबादास हरीभाऊ वाघमारे (वय ७० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने वाघमारे परिवारावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्या पश्चात मुली,मुलगा, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
Comments
Post a Comment