शेवगाव शहरातील गेवराई रोड च्या ‘राजयोग’ हॉटेलवर पोलिसांचा छापा ३ बांगलादेशी मुलींची सुटका, देहव्यापार रॅकेट उघड
शेवगाव शहरातील गेवराई रोड च्या ‘राजयोग’ हॉटेलवर पोलिसांचा छापा ३ बांगलादेशी मुलींची सुटका, देहव्यापार रॅकेट उघड
[ अविनाश देशमुख शेवगाव ] 9960051755 9270542511
दिनांक 06 मार्च 2026 वार शुक्रवार शेवगाव ~ प्रतिनिधी या बाबत सविस्तर वृत्त असे की
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील राजयोग हॉटेल/लॉजवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मोठे देहव्यापार रॅकेट उघडकीस आले असून तीन बांगलादेशी मुलींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) यांना गुप्त माहिती मिळाली होती की शेवगाव-गेवराई रोडवरील राजयोग हॉटेलमध्ये परदेशी आणि परप्रांतीय मुलींना ठेवून जबरदस्तीने देहव्यापार करवून घेतला जात आहे. त्यानुसार ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि त्यानंतर अचानक छापा टाकला. या कारवाईत बांगलादेशातून एजंटमार्फत आणलेल्या तीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून लॉजमध्ये ठेवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ त्या मुलींची सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी
कृष्णा बापू झिरपे (रा. चापडगाव रोड कोळगाव )ता शेवगांव
प्रतिक मिलिंद रांधवने (रा. माळीवाडा, शेवगाव) बाबासाहेब रामभाऊ अंधारे (रा. शेवगाव)
अजिंक्य विठ्ठल अंधारे (रा. शिवाजीनगर, शेवगाव)
अमोल पठाडे नेवासा जिल्हा अहिल्यानगर अमर मारुती ढाकणे (रा. हसनापूर, शेवगाव)
हे त्यांच्या फायद्यासाठी परदेशी आणि परप्रान्तीय मुलींना शेवगाव शहरातील गेवराई रोड च्या ‘राजयोग’ हॉटेलवर पोलिसां डांबून वेश्या व्यवसाय करवून घेत होते त्यामुळे या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक १५९/२०२६ नुसार भारतीय दंड संहिता कलम १४४, १४३(३) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ च्या कलम ४, ५, ६, ७ व ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक तसेच AHTU पथकाचे पोलीस निरीक्षक हमीद शेख आणि त्यांच्या टीमने केली.
या घटनेमुळे शेवगाव शहरात खळबळ उडाली असून हॉटेल आणि लॉजच्या आड सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ताजा कल
शेवगांव शहरात एक [ पश्चिम बंगालचा हिश्ट्री शीटर गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी तडीपार गुंड राहत असुन ] तो रेड लाईट एरिया आणि शहरातील हॉटेल्स ला बांगलादेशी आणि पर प्रांतीय महिला पुरवण्याचे काम करत आहे. त्याला राहायला घर देणाऱ्या आणि त्याला शेवगांव पोलीस जेरबंद करणार का असा प्रश्न सर्वसामान्य शेवगावकरांना पडला आहे.
क्रमशः
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार
Comments
Post a Comment