डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे राम आदोडे यांचा सचिव पदाचा राजीनामा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – भीमनगर येथील रहिवासी राम बाबासाहेब अदोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. दिनांक 9 मार्च 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्यापक बैठकीत अदोडे यांची सर्वानुमते सचिवपदी निवड करण्यात आली होती.

मात्र, निवड झाल्यानंतर समितीच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी पदाचा राजीनामा जाहीर केला. समितीचे अध्यक्ष व त्यांच्या काही सहकाऱ्यांकडून, तसेच राजकीय पाठबळ असलेल्या काही नेत्यांच्या प्रभावामुळे, जयंती उत्सवाच्या नियोजनात आपल्याला योग्य स्थान दिले जात नसल्याचा आरोप अदोडे यांनी केला आहे.

“समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती भव्य आणि उत्कृष्ट पद्धतीने साजरी व्हावी, या उद्देशाने मी कोणत्याही स्वार्थाशिवाय सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मला विश्वासात घेतले जात नसल्याने आणि वेगळेच वातावरण निर्माण झाल्याने मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला,” असे अदोडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यामुळे जयंती उत्सव समितीत खळबळ उडाली असून, पुढील कार्यपद्धतीबाबत समाजात चर्चा सुरू झाली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी