पोलिस भरतीत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना बीड येथून आर्थिक मदत
बीड (प्रतिनिधी):
बीड येथे झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या दीपक भास्कर वाव्हळे (रा. मांडेखेल, ता. परळी वैजनाथ, जि. बीड) यांच्या कुटुंबीयांना बीड येथील महामानव अभिवादन ग्रुपच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली.
या घटनेनंतर दीपक वाव्हळे यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी महामानव अभिवादन ग्रुप, बीड यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला समाजातील नागरिकांनी प्रतिसाद देत एकूण २६,६०० रुपये इतकी रक्कम जमा झाली.
ही रक्कम ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मांडेखेल येथे जाऊन वाव्हळे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वनपर भेटीद्वारे दीपक यांच्या आई-वडील व भावाकडे सुपूर्द केली. यावेळी कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत सर्वांनी त्यांना धीर दिला.
समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन दाखवलेली ही मदतीची भावना ही सामाजिक एकतेचे व माणुसकीचे उदाहरण असल्याचेही यावेळी उपस्थितांनी सांगितले.
Comments
Post a Comment