आष्टीचे नायब तहसीलदार भगीरथ धारक यांना मातृशोक


आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : 
       आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील रहिवासी व सध्या आष्टी शहरातील विनायक नगर येथे स्थायिक असलेले आष्टी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार भगीरथ धारक यांच्या मातोश्री कौशल्याबाई चंद्रभान धारक (वय वर्षे ९०) यांचे आज शुक्रवार पहाटे वर्धापकाळाने निधन झाले . त्यांचा अंत्यविधी धानोरा येथील अमरधामा येथे करण्यात आला . 
 कौशल्याबाई धारक यांच्या पाश्चात बापूराव  
धारक,नायब तहसीलदार भगीरथ धारक, संतोष धारक, गुलाब धारक ४ मुले असुन सुनंदा रामदास दळवी १ मुलगी आहे . 
  अंत्यविधी प्रसंगी माजी आ. साहेबराव दरेकर , उपविभागीय अधिकारी वसीमा शेख,तहसीलदार वैशाली पाटील, ॲड.हनुमंतराव थोरवे,माजी सभापती संजय ढोबळे,माजी सरपंच सतीशशेठ धस, माजी सभापती अंकुशराव चव्हाण, माजी सभापती विजयकुमार बांदल, पंचायत समिती सदस्य परमेश्वर (काका) शेळके, ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,अनिलतात्या ढोबळे,संजय मेहेर, सुभाष राऊत, जालिंदर वांढरे, माजी सरपंच राजाभाऊ शेळके, माजी सरपंच भाऊसाहेब शेळके, मच्छिंद्र शेळके, भगवान गायकवाड, माजी सरपंच देविदास उदावंत, पीएसआय गोरख शेळके,अजिनाथ शेळके,रावसाहेब वाघमारे,पत्रकार गणेश दळवी, अविनाश कदम, रघुनाथ कर्डिले व सर्व पत्रकार बांधव, सुभाष जगताप, आप्पा बर्डे, कैलास पोकळे, रावसाहेब धस, अनिल राऊत, ह.भ.प. हौसराव आजबे महाराज, अन्सार शेख 
इंद्रकांत शेंदूरकर,
बाळासाहेब शेंदुरकर,मंगल चंद्रकांत शिंदे,सर्व तलाठी /मंडळाधिकारी, आष्टी तहसील कार्यालयातील अधिकारी /कर्मचारी तसेच जनता कनिष्ठ महाविद्यालय, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद कै.बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय केरूळ, सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार,धानोरा परिसरातील सर्व स्तरातील ग्रामस्थ यांच्यासह सामाजिक/ राजकीय/ शैक्षणिक/धार्मिक/व्यापार क्षेत्रातील आदी मान्यवर अंत्यविधी प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कौशल्याबाई धारक यांचा दशक्रिया विधी रविवार दि.२२ मार्च २०२६ रोजी धानोरा येथील अमरधाम येथे करण्यात येणार आहे . 
       नायब तहसीलदार भागीरथ धारक यांच्या परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला यांच्या दुःखात आष्टी प्रतिनिधी गोरख मोरे यांच्या परिवारासह - २३ मराठी न्यूज पोर्टल/ यूट्यूब चैनल परिवार बीड सहभागी आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी