बीडमध्ये खळबळ: झोपेत असलेल्या तरुणाचा दगडाने ठेचून खून



बीड (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून किरकोळ वाद, रागाच्या भरात झालेल्या हाणामाऱ्या तसेच खुनांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आज दिनांक 6 मार्च रोजी बीड शहरात आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे.


 मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत बस स्थानकाच्या मागील बाजूस एका अज्ञात तरुणाचा झोपेतच दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पो.हे. रवी आघाव सह पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासणीसाठी बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, खून झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून मृत तरुणाची ओळख पटवण्यात येत असून घटनेमागील नेमके कारण काय याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी