प्रत्येक क्रांतीच्या माघे आईच असते - महंत राधाताई महाराज सानप आईसाहेब
प्रत्येक क्रांतीच्या माघे आईच असते - महंत राधाताई महाराज सानप आईसाहेब
आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद - प्राजक्ताताई धस
युवा पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय ४३ नारी सन्मान पुरस्कारांचे वितरण
आष्टी। प्रतिनिधी
"प्रत्येक क्रांतीच्या माघे आईच असते. जन्मापासून प्रत्येक यशोगाथेमागे आईचे योगदान महत्त्वाचे असते. आईनेच मुलींना चांगले संस्कार द्यायला हवेत. सध्याच्या काळात शिक्षणामुळे अनेक महिला विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मात्र, तरीही तळागाळातील महिला अजूनही प्रगतीपासून दूर आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे," असे प्रतिपादन महंत राधाताई महाराज सानप (आईसाहेब) यांनी केले.
आष्टी येथील पंचायत समिती सभागृहात आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून महानंद मुंबईच्या संचालिका प्राजक्ताताई धस यांनी सांगितले की, "आष्टी तालुका युवा पत्रकार संघ नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असतो. गेल्या ७ वर्षांपासून सातत्य राखत जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्याचे कार्य ते करीत आहेत. यामुळे महिलांना प्रेरणा मिळत आहे. युवा पत्रकार संघाचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे."
यावेळी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय नारी सन्मान २०२६ पुरस्कारांचे वितरण गुरूवार दि १२ मार्च रोजी करण्यात आले. यामध्ये विविध क्षेत्रातील ४३ कर्तबगार महिलांचा समावेश होता.
पुढे बोलताना अध्यक्ष प्राजक्ताताई धस म्हणाल्या, "आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या कार्याचा ठसा उमटवीत त्या पुढे जात आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. प्रत्येक स्त्रीने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी," असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास गटविकास अधिकारी गोकुळ बागलाणे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, गटशिक्षणाधिकारी मोहन काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका सिंघण, सहाय्यक अभियंता कोमल शिंदे, सरपंच वंदनाताई गायकवाड, शालिनीताई मुळे, प्रतिभाताई थोरवे, जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा विद्याताई चव्हाण, आशा कारंडे, वर्षाताई शिंदे, डॉ.सविता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बाळासाहेब तळेकर यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष अविनाश कदम व पत्रकार समीर शेख यांनी तर आभार सचिव गहिनीनाथ पाचबैल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अविनाश कदम, सचिव गहिनीनाथ पाचबैल, उपाध्यक्ष जावेद पठाण,ज्येष्ठ पत्रकार निसार शेख, संतोष दाणी, पत्रकार समीर शेख,संतोष नागरगोजे, राजेंद्र लाड,अक्षय विधाते,सोपान पगारे, प्रेम पवळ,संस्कार लाड, विठ्ठल राख, सचिन पवार, किरण शिनगिरे,ओंकार कदम, सुरज शिंदे, दिपक उंबरकर,अर्थव डाडर यांनी परिश्रम घेतले.
चौकट
नारी सन्मान पुरस्काराने यांचा झाला सन्मान
महंत राधाताई महाराज सानप (आईसाहेब) - आदर्श कीर्तनकार व समाज प्रबोधनकार (महासांगवी संस्थान पाटोदा), सौ. सुशिला साहेबराव चव्हाण - आदर्श माता (मुर्शदपूर, आष्टी), डॉ. आम्रपाली मोहिते - आदर्श समाज सेविका (पुणे), कु. श्रावणी आजिनाथ दळवी - आदर्श खेळाडू (१९ वर्षीय महाराष्ट्र क्रिकेट, रुईनालकोल), डॉ. स्नेहा विशाल हरकर - आदर्श डॉक्टर (कडा), डॉ. सुपर्णा देशमुख - आदर्श प्राध्यापिका/लेखिका (कडा), डॉ. सिमा सतीश काटकर - आदर्श समाज सेविका (वडापुरी, ता. इंदापूर), मुबिना जावेद शेख - आदर्श सरपंच (शेडाळा, ता. आष्टी), अॅड. सारिका बालासाहेब कुलकर्णी - आदर्श विधिज्ञ (बीड), रेणुका चेतन वराडे/सानप - आदर्श सामाजिक कार्यकर्ती (अहिल्यानगर), उझमा सलीम शेख - आदर्श पोलीस अधिकारी (आष्टी), निकिता बाबासाहेब पोकळे - आदर्श बास्केटबॉल खेळाडू (कडा), प्रज्ञा सुभाष मुनेश्वर - आदर्श ग्रामपंचायत अधिकारी (भाळवणी/हाजीपूर), आशा वैजनाथ फड - आदर्श लेखिका (शेवगाव), प्रियंका सचिन विधाते - आदर्श प्राचार्य (सियाज प्रीस्कुल, आष्टी), सुविद्या विशाल चौधरी - आदर्श लेखिका/शिक्षिका (झगडेवाडी, ता. दौंड), कांचन प्रमोद आहेर/बिडवे - आदर्श महिला आरोग्यस्वस्थ नारी (अहिल्यानगर), रेखा संतोष कणसे - आदर्श कर्तृत्ववान माता (वटणवाडी, ता. आष्टी), भक्ती गणेश गिरी - शिवचरित्रकार (कासरी, ता. आष्टी), सुनिता गंगाधर वेडे - आदर्श ग्रामपंचायत अधिकारी (साबडखेड, ता. आष्टी), राजश्री शिंदे - आदर्श कलाकार (पुणे), मिनाज सिकंदर शेख - आदर्श शिक्षिका (आष्टी), प्रियंका महेश टांगळ/फसले - आदर्श अभियंता (दौलावडगाव, ता. आष्टी), प्रिया मंगेश होळकर - आदर्श अंगणवाडी सेविका (धानोरा, ता. आष्टी), संगिता भानुदास जाधव - आदर्श शिक्षिका (आश्रमशाळा सुरुडी, ता. आष्टी), ज्योत्स्ना शारदाबाई मुसळे - आदर्श ग्राममहसूल अधिकारी (वाळुंज, ता. आष्टी), म्हसोबा महिला शेतकरी बचत गट - आदर्श महिला गट (पारोडी, ता. आष्टी), उज्वला केशवराव बोर्डे - आदर्श सहाय्यक कृषी अधिकारी (जळगाव, ता. आष्टी), मुग्धा भैरवनाथ काशीद - आदर्श कवयित्री (कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), डॉ. मेघा संतोष डहाळे - आदर्श सामाजिक कार्यकर्ती (अहिल्यानगर), सरिता मारुती जगताप - आदर्श महिला संगीत विशारद (अहिल्यानगर), सुनिता जनक पोकळे/शिंदे - आदर्श महिला तबला संगीत विशारद अलंकार (आष्टी), स्वाती नानासाहेब पोकळे - आदर्श महिला ग्रामसखी (बेलगाव, ता. आष्टी), सुरेखा बबन सदाफुले - आदर्श महिला आरोग्य सेविका (मातकुळी, ता. आष्टी), सायली अनंत चौधरी/हंबर्डे - आदर्श प्राध्यापिका (आष्टी), सुवर्णा मच्छिंद्र गावडे - आदर्श महिला आशा वर्कर (क-हेवडगाव), सुमित्रा कल्याण काळे - आदर्श महिला महसूल सेवक (आष्टी), अलका बाबुराव ससाणे - आदर्श महिला सुपरवायझर (धामणगाव, ता. आष्टी), श्रावणी सोमनाथ पवळ - उत्कृष्ट चेंग ब्युटी मेकअप आर्टिस्ट (कडा, ता. आष्टी), रुपाली तुकाराम ढोबळे - आदर्श महिला लाईनमन (धानोरा, ता. आष्टी), सिमाबेगम जावेद सय्यद - आदर्श महिला उद्योजिका (मुर्शदपूर, ता. आष्टी), अस्मिता अतुल सुरवसे - आदर्श महिला गायिका (बीड), कविता माणिकराव पानसरे - प्राथमिक शिक्षिका (आश्रमशाळा सुरुडी) यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
Comments
Post a Comment