नागसेन बुद्धविहार परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती जाहीर



परळी (प्रतिनिधी) – महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त नागसेन बुद्धविहार परिसरातील उपासक-उपासिका यांची सभा दिनांक ११ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली. ही सभा गतवर्षीचे अध्यक्ष प्रा. टी. जी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी गतवर्षीचे अध्यक्ष प्रा. टी. जी. कांबळे यांनी मागील वर्षातील जमा-खर्चाचा ताळेबंद सभागृहात सादर केला. उपस्थितांनी त्यास एकमताने मान्यता दिली. यानंतर सर्व उपस्थितांच्या चर्चेनंतर व एकमताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती महोत्सव समिती पुढीलप्रमाणे निवडण्यात आली –अध्यक्ष ए. एस. उजगरे(बापू),उपाध्यक्ष : ईश्वर धन्वे,सचिव : ॲड. के. आर. गाडे,सहसचिव : श्रीमंत उजगरे,
कोषाध्यक्ष : उमाजी वाघमारे (बापू) या सभेला परिसरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये बौद्धाचार्य डी. एन. पोटभरे, शारदाताई औसरमल, ॲड. डी. एम. विद्यागर, प्रा. टी. जी. कांबळे, ए. एस. उजगरे, प्रा. व्ही. आर. गाडे, प्रा. आर. डी. जाधव, ए. एस. शिंदे, सुधाकर वाघमारे, सरपंच मारोती सुरवसे, सुनील कांबळे, ईश्वर धन्वे, श्रीमंत उजगरे, प्रा. संजय घाडगे, सम्यक विद्यागर, आरुष सिरसठ, टी. बी. उजगरे, विनोदकुमार औसरमल, डॉ. अमरेंद्र विद्यागर, लखन नागदंड, राणुजी निकाळजे, ॲड. के. आर. गाडे, आर. एम. वाघमारे, माणिक घाडगे, उमाजी वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी