बंद पडलेले बोर तात्काळ सुरू; प्रभागातील नागरिकांकडून मागणी होताच नगरसेविका मीरा नागरगोजे घेतली तात्काळ दाखल
परळी (प्रतिनिधी) – परळी शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये काही नविन व दीर्घकाळापासून बंद पडलेले बोरवेल तात्काळ दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत केल्याने प्रभाग चार मधील स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवनिर्वाचित नगरसेविका सौ. मीरा केशव नागरगोजे यांनी नागरिकांच्या मागणीकडे तत्परतेने लक्ष देत आवश्यक कामे हाती घेतली.
पाणीपुरवठा सभापती सौ.जयश्रीताई पापा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील मूलभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. स्वच्छता मोहीम, रस्त्यावरील दिवाबत्ती, नाल्यांची साफसफाई यासह नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येवरही तत्काळ उपाययोजना करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, धनगर गल्ली, उखळवेस गल्ली, गवंडी गल्ली तसेच भीमनगर परिसरातील बंद पडलेले बोरवेल दुरुस्त करून त्यावर पाईपलाईन व नळ वाल बसवण्यात आले. त्यामुळे या भागातील नागरिकांना पुन्हा नियमित पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे.
नगरसेविका सौ. मीरा केशवराव नागरगोजे यांच्या पुढाकारामुळे प्रभागातील पाण्याची समस्या मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले असून भविष्यातही प्रभागाचा विकास अशाच प्रकारे सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment