पोलीस वेलनेस व थेरपी सेंटरची पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांच्या हस्ते उद्घाटन
बीड (प्रतिनिधी) जुने एस.पी. ऑफीस समोरील संगम हॉल, बीड येथे पोलीस वेलनेस व थेरपी सेंटर तसेच योग अभ्यास, झुंबा अॅरोमिक्स व करा ओके सिंगींग एकाच छताखाली संगम हॉल बीड येथे पोलीस अधिक्षक नवनीत कावत साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेलनेस सेंटर, थेरपी, योग अभ्यास व करा ओके सिंगींग सर्व पोलीस कर्मचारी यांनी लाभघ्यावा. तसेच जेष्ठ नागरीकांनी सुध्दा याचा लाभ घ्यावा असे पोलीस अधिक्षक नवनीत कावत साहेब यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. या उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक बी. बी. गात साहेब, पी.एस.आय. राजकुमार प्रकाश, अॅड अविनाश गडगे, हेड कॉन्स्टेबल नितीन वडमारे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमती मनिषा वाव्हळ, महिला पोलीस अॅड कॉन्स्टेबल माया साबळे, निवृत्त पोलीस अधिकारी सय्यद अलीम, श्री. मॅथू जोसेफ, बसस्टँड इनचॉर्ज श्री. किरण बनसोडे, भास्कर वडमारे, विनोद सवई, जनार्धन वडमारे आदी पोलीस कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. या पोलीस वेलनेस व थेरपी सेंटर तसेच योग अभ्यास, झुंबा अॅरोमिक्स व करा ओके सिंगींग या सर्व सुविधा सर्वसामान्यासाठी अल्पदरात उपलब्ध असून त्याची सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान पोलीस वेलनेस व थेरपी सेंटरचे संचालक श्री. राजकुमार प्रकाश यांनी केले आहे.
Comments
Post a Comment