लिंबागणेशमध्ये उत्साहात पारंपरिक होलिकेचे दहन११ क्विंटल सरपनाची केली होळी

लिंबागणेशमध्ये उत्साहात पारंपरिक होलिकेचे दहन

११ क्विंटल सरपनाची केली होळी
 बीड तालुका उत्सवाचे गाव म्हणून ओळख असलेल्या बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे यंदा होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील मारुती मंदिर, लिंबागणेश समोर पारंपरिक पद्धतीने ११ क्विंटल सरपनाची भव्य होलिका दहन करण्यात आली. होलिका दहनापूर्वी विधिवत पूजन करण्यात आले. गावातील ज्येष्ठ मंडळी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत धार्मिक मंत्रोच्चारात पूजा संपन्न झाली. त्यानंतर पारंपरिक वाद्य हलगीच्या गजरात वातावरण दणाणून गेले. हलगीच्या तालावर तरुणांनी जल्लोष करत उत्साहात होळी प्रज्वलित केली. पुर्वी गावातील पाटलांना होलिका दहन करण्याचा मान असायचा , गावातील तरुणांनी पुढाकार घेत लोकवर्गणी जमा करून ही परंपरा पुन्हा सुरू केली आहे. अनेक वर्षांपासून बंद पडलेली ही मानाची होळी पुन्हा पेटल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
यावेळी हरिओम क्षीरसागर यांनी सर्व ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल आभार मानत पुढील वर्षी यापेक्षा अधिक भव्य स्वरूपात होळी साजरी करण्याचा मानस व्यक्त केला.
पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि “होळी रे होळी”च्या जयघोषात लिंबागणेशची होलिका दहन उत्साहात पार पडली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी