गेवराई येथे तालुकास्तरीय क्रीडा प्रतियोगिता संपन्न


भारत सरकारची स्वायत्त संस्था मेरा युवा भारत, बीड आणि पाथ फाइंडर करिअर अकॅडमी गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'तालुका स्तरीय क्रीडा प्रतियोगिता' र भ अट्टल कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय गेवराई येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवा अधिकारी सत्यजित संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
 क्रीडा स्पर्धेत युवकांसाठी १०० मीटर धावणे, गोळा फेक आणि कबड्डी व या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच युवतींसाठी १०० मीटर धावणे, गोळाफेक आणि रस्सीखेच या स्पर्धांमध्ये आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी चुरशीचे प्रदर्शन केले. 
सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पाथ फाइंडर करिअर अकॅडमी गेवराई संचालक प्रा.प्रल्हाद खेत्रे सर व पवन राऊत सर, छत्रपती संभाजीनगर तालुका समन्वयक निलेश त्रिभुवन,गेवराई तालुका समन्वयक पांडुरंग खरात, यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. तसेच या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रमोद राऊत,आदित्य राऊत,धस मनिषा हे होते. यासाठी पाथ फाइंडर करिअर अकॅडमी गेवराई सेवा सहयोगाने या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी