हिंगणी खुर्दच्या 50 ते 60 कुटुंबांना रहदारीचा रस्ताच नाही
हिंगणी खुर्दच्या 50 ते 60 कुटुंबांना रहदारीचा रस्ताच नाही
मा. तहसीलदार बीड यांनी रस्ता खुला करून देण्याची ग्रामस्थांची मागणी.
रस्ताच नसल्याने 50 ते 60 कुटुंब जगत आहेत बंदिवासात
(बीड प्रतिनिधी ) :- बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील मौजे हिंगणी (खुर्द) या गावाचे 50 ते 60 कुटुंब सध्या हवालदिल झाले आहे आहेत. कारण या कुटुंबाची वस्ती ज्या ठिकाणी आहे त्या वस्तीला जाण्यासाठी जो रहदारीचा मुख्य रस्ता होता तो रस्ताच गट क्रमांक 404 मधील शेतकऱ्याने अडवला आहे. आणी रस्ता अडवल्यामुळे हे 50 ते 60 कुटूंब सध्या एकाद्या बंधीस्त जागेत कैद केल्यागत कैद आहेत. कारण यांचा येण्याजाण्यासाठीचा रस्ताच गट क्रमांक 404 मध्ये शेत असणाऱ्या शेतकऱ्यानी बंद केल्यामुळे या 50 ते 60कुटुंबाना बंदिस्त जागेत आणी बंदिस्त अवस्थेत राहावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाने शेती संबंधित बांध रस्ते, वस्त्यावर जाणारे रस्ते, पांदन रस्ते,सार्वजनिक वाद निर्माण असलेले रस्ते खुले करण्याची योजना आणली आहे. मात्र मौजे हिंगणी खुर्दच्या या गट क्रमांक 404 मधील रस्त्या बाबतीत ही योजना हवेतच विरून गेली की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण या 50 ते 60 कुटुंबानीं या रस्तायासाठी बीडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री. चंद्रकांत शेळके यांना या आधी दोन तिन वेळा अर्ज, निवेदने, प्रत्यक्ष भेटी गाठी, विनंतीअर्ज केले आहेत की, आमचा रहदारीचा हा मुख्य रस्ता असून तो 404 गट क्रमांक मधील शेतकऱ्याने अडवला आहे आणी हा अडवलेला रस्ता आम्हास खुला करून देण्यात यावा. मात्र आजपर्यंत बीड तालुक्यातील शेकडो रस्त्याचे वाद मिटवून, शेत रस्ते, पानंदन रस्ते, गाव रस्ते, वस्तीवर जाणारे रस्ते यांचे वाद मिटवून शासकीय स्तरावर ते रस्ते खुले करणाऱ्या बीडचे मा. तहसीलदार श्री. चंद्रकांत शेळके यांना मात्र हिंगणी खुर्द चा हा रस्ता अजून खुला करता आला नाही ही शोकांतिका आहे. आम्ही बीड तालुक्यातील रहिवाशी आहोत त्यामुळे आम्ही कर्तव्यदक्ष असणाऱ्या तहसीलदार साहेबानं कडे वारंवार विविध मार्गाने,आम्हाला आमचा हा रस्ता खुला करून देण्याची मागणी करत आहोत.तरी मेहरबान तहसीलदार श्री. चंद्रकांत शेळके साहेबांनी आमच्या या प्रश्नांकडे प्रकर्षाने लक्ष घालून आम्हाला आमचा गट क्रमांक 404 मधील हा रहदारीचा रस्ता मोकळा करून देऊन आमच्या या 50 ते 60 कुटुंबावर मेहरबानी करावी अशी विनंती आणी मागणी मोजे हिंगणी खुर्द येथील विनायक वसंत तांदळे यांच्यासह 50 ते 60 कुटुंबातील सदस्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment