राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण उद्दिष्ट पुर्तीची 13 फेब्रुवारी 2026 ची बैठक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात असंतोषजनक ठरली- माजी सैनिक प्रकाश वाघमारे



नालसा वीर परिवार सहयोग योजनाचे सरक्युलर भारताचे सर्वोच्च न्यायाधीश यांच्या आदेशाने सर्वोच्च न्यायालयामार्फत 18 जुलै 2025 मध्ये शुभारंभ झाला. या योजनेचे कार्य सैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटूंब यांना कायदेशीर प्यारा लिगल वॉलींटअर सेवा देणे हे आहे. दुर्गम भागत निवास करणारे सैनिक आर्थिक, मानसिक पिडीत सैनिक कुटूंब ज्यांना न्यायालय प्रक्रिया करावयाची आहे. परंतू अपुरी माहिती, आर्थिक कमजोरी, अपंगत्व विविध अडचणीत ग्रस्त असा सैनिक माजी सैनिकांना मदत करता यावी, त्यांच्या त्यागाची परतफेड शासन प्रशासन स्तरावर तत्पर करता यावी हा हेतू आहे. यासाठी केंद्र राज्य जिल्हा संरक्षण विभाग मध्यस्थीने योजना राबविण्याचे आदेशित केले आहे.

महाराष्ट्र राज्य संलग्न संरक्षण विभाग याचे मेळावे जागरूकता करताना अद्याप दिसत या योजनेचे प्रसार, प्रचार होणे हे सैनिक विभाग व सैनिक जिल्हा कार्यालयाची जबाबदारी आहे. यास बीड जिल्हा सैनिक कार्यालय मागे असू शकत नाही. औपचारिकता पूर्ण करण्याकरिता 13 फेब्रुवारी 2026 रोजी बीड जिल्हा सैनिक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांने बैठकीचे आयोजन एकच दिवसात काही मोजक्या माजी सैनिकांना फोनवर वार्तालापच्या माध्यमाने केले. ते ही जे माजी सैनिक यांचे बाहुले आहेत, बैठक बंद रुम मध्ये ठेवण्यात आली. सैनिक कार्यालयाचे पांच कर्मचारी व इतर पाच माजी सैनिक बैठकीचा सोहळा प्यारा लिगल वॉलींटअर अधिकारी तत्वशील कांबळे यांनी थातुर मातुर बाताचित ने पूर्ण केला. भिंतीवर दोन बाय तीन चे बॅनर होते. त्यावर नालसा कायदेशीर सल्ला असे लिहीले होते व त्यावर लिगल वालेंटर यांचा नंबर दाखवण्यात आला होता. जिल्ह्यातून पाच माजी सेनिक मेळाव्यास हजर असणे म्हणजे सेनिक कार्यालय, बीड व सेवाभावी संस्थेचे लिगल वॉर्लीटअर यांच्या अकर्तत्वाचा भाग दिसून आला. योजनेचा प्रचार, प्रसार नगण्य दिसून येतो. सन 2025 ला सैनिक कार्यालयात माहिती संपर्क फोन नं. असा उल्लेख करून बॅनर लावले होते. मी बातमी प्रसिध्दकर्ता फोन करून माहिती विचारत होतो. परंतू लिगल वॉलींटअर अधिकारी फोन उचलत नव्हते. तोच मुद्या मी सैनिक कार्यालय कर्मचारी व तत्वशील कांबळे मेळावा संबोधीतकर्त्यांना विचारला तेंव्हा माझे ऐकून न घेता दुर्लक्षीत केले व मला तुमची जरूरत नाही. इतर माजी सैनिकांना मला मदत करावयाची आहे, असे म्हणून मला लिगल वॉलींटअर सेवा पासून वंचीत ठेवले. जिल्हा सैनिक कार्यालय कर्मचारी यांनी वाघमारे माजी सैनिकाला नालसा वीर परिवार सहयोग योजनेत समाविष्ट करणे नितांत आवश्यक आहे. असे म्हटले सुध्दा नाही. शेवटी जिल्हा सैनिक कार्यालय कर्मचारी व तत्वशील कांबळे यांनी साखरपुड्याला बसलेल्या वृंदाप्रमाणे फोटो, सेल्फी केली व वर्षभर कार्यक्रम राबवल्याची दिखावगीर केली. मेळावा घेतल्याचे मिडीयात प्रकाशीत केला, जिल्हा सैनिक कार्यालय कर्मचारी यांनी असे अधुरे पडताळणी कार्यक्रम राबवणे बंद करावेत नसता वरिष्ठ संस्था प्रशासनाकडे तक्रार करण्यात येईल याची दक्षता घ्यावी.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी