शिवसेना नेते कुंडलीक खांडे, गणेश खांडे यांच्यासह ईतर आरोपीवर बलात्कार पोस्को, ॲट्रासिटी आंतर्गत गुन्हा दाखल करण्या संदर्भात ॲड.प्रकाश आबेंडकर यांच्या बीड पोलीसांना सुचना

शिवसेना नेते कुंडलीक खांडे, गणेश खांडे यांच्यासह ईतर आरोपीवर बलात्कार पोस्को, ॲट्रासिटी आंतर्गत गुन्हा दाखल करण्या संदर्भात ॲड.प्रकाश आबेंडकर यांच्या बीड पोलीसांना सुचना.

बीडच्या त्या अतिप्रसंग झालेल्या अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबाने घेतली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांची भेट..!
मागील महिन्यात 5 तारखेच्या सायंकाळी 6 वाजता  नामक 11 वर्षाच्या मुलीला तिची आई ज्या घरी घर काम करण्यास गेली त्या घराच्या पार्किंग मधे खेळत असलेल्या जागेवरुन अपहरण सूरजकुमार खांडे या नाराधमाने केले.पुढे तिल सुनसान ठिकाणी नेऊन रात्री तीन वेळा तिच्यावर त्याने अतिप्रसंग केला.मुलगी केवळ 11 वर्षाची चिमुकली व नराधम 23 वर्षाचा.मुलीच्या आई वडिलांनी रात्री मुलगी बेपत्ता असल्याने सगळीकडे शोधाशोध करून शेवटी शिवजी नगर पोलिस स्टेशन गाठले आणि मध्यरात्री 1:30 च्या सुमारास मिसिंगची तक्रार दाखल केली.नाराधामने दुसऱ्या दिवशी पहाटे 5 च्या सुमारास मुलगी घरा बाहेर अनुन सोडली.घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला मात्र समाजात इज्जत जाईल या भीतीने कुटुंब शांत बसले.
मात्र तो नराधम इथेच थाबला नाही तर त्या नंतर जवळपास 10 दिवस रोज त्या मुलीच्या घरा कडे चकरा मारून तिला परत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता.या त्रासाला कंटाळून शेवटी 26 तारखेला पिडित मूलीसह कुटुंब परत शिवजी नगर पोलीस स्टेशनला गेले व घडलेला सर्व प्रकार सांगून तक्रार दाखल केली.
अरोपिचा कुंडलिक खांडे, गणेश खांडे नामक भाऊ राजकारणात असल्याने त्याने या प्रकरणात पोलिसांना मॅनेज करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र पीडितेचे कुटुंब तक्रार माघार घेत नसून मिटवामिटवी करण्यास तयार नसल्याने नाराधमाचा भाऊ शिवसेना माजी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे हे काही गुंड सोबत घेऊन पीडितेच्या कुटुंबाला मारहाण करुण प्रकरण शांत करण्याच्या दृष्टिने बऱ्याच वेळा पीडित कुटुंबा कडे जाउन जीवे मरण्याची धमकी देऊन प्रकरण मिटवन्यासाठी दबाव टाकत होते. तसेच तक्रार मागे न घेतल्यास मुलीच्या वडीलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने व दबावामध्ये घेऊन जबरदस्तीने मुलीचे चुकीचे स्टेटमेंट कुंडलीक खांडे, गणेश खांडे व ईतर लोकांनी घेतले.
तरीही या कुटुबाने परत जाऊन तक्रार दिली, तेव्हा यातील मुख्य नराधम आरोपीस आटक केली आहे. मात्र या गुन्ह्यात आरोपींची मदत करणारे, पडीतांना जिवे मारण्याच्या धमक्या देऊन जबरदस्ती चुकीचे स्टेटमेंट द्यायला भाग पाडणारे कुंडलीक खांडे, गणेश खांडे व ईतर सर्वांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे आशी मागणी केल्याने,
कुंडलिक खांडे आणि त्यांचे साथीदार यांच्या पासून पीड़ित मुलगी आणि तिचे कुटुंब यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने, शेवटी या कुटुंबाने पीड़ित मूलीसह काल सकाळी आदरणीय अँड.प्रकाश आंबेडकर साहेबांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला व मुख्य अरोपिसह कुंडलिक खांडे,अमोल डरपे,गणेश खांडे,धोंडीराम खांडे,गणेश खोड व मुख्य अरोपिचा चुलता इत्यादी पासून पीड़ित कुटुंबाला धोका असल्याने यांना तत्काळ अटक करून पिडीत कुटुंबाला संरक्षण मिळावे अशी विनंती कुटुंबाने बाळासाहेब आंबेडकर यांना केली.बाळासाहेब आंबेडकर यानी तत्काळ तपास अधिकारी पूजा पवार (dysp) यांना फोन लाऊन प्रकारणाची गंभीरता सांगून कुडलीक खांडे, गणेश खांडे, यांच्यासह ईतर सर्वांना सह आरोपी करून त्यांच्यावर कारवाही करण्याच्या सुचना केल्या.
या पीड़ित मूलीला न्याय मिळे पर्यंत वकीला पासून ते तुम्हाला लागेल ती मदत करत सोबत राहु असा शब्द अँड.प्रकाश आंबेडकर साहेबांनी या कुटुंबाला दिला.आता लवकरच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्य महिला आयोग ,SC ST आयोग आणि मानव अधिकार अयोगात पन तक्रार दाखल करण्यात येणार आहे….

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी