शिरूर कासार तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी बांधणी-विविध पदांसाठी तरुणांना संधी-सोपान (काका) मोरे /आजिनाथ खेडकर यांचे जाहीर आवाहन
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :
आगामी जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर कासार ( जिल्हा बीड ) तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष अधिक आक्रमक आणि सक्रिय झाला असुन पक्षाची संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सुशिक्षित, निष्ठावंत तरुणांना नेतृत्वाची संधी देण्यासाठी तालुक्यात अनेक रिक्त पदांवरती संधी देण्यात येनार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख सोपान (काका )मोरे आणि उपजिल्हाप्रमुख आजिनाथभाऊ खेडकर यांनी तालुक्यातील तरुणांना राजकारणात सक्रिय होण्याचे जाहीर प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात जाहीर आवाहन केले .
पुढे सांगितले की, तरुणांच्या हाती शिवसेनेची धुरा असून
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने व संपर्क नेते आबंदासजी दानवे साहेब संपर्क प्रमुख परशुराम जाधव साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भैया गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर कासार तालुक्यात नवीन फळी उभारली जात असुन केवळ कार्यकर्ते म्हणून नव्हे, तर 'तालुक्याचे भविष्य' म्हणून तरुणांनी पुढे यावे, या उद्देशाने ही पद नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले .
या महत्त्वाच्या पदांसाठी
तालुक्यातील ग्रामीण/ शहरी भागात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी खालील पदांवर नियुक्त्या केल्या जाणार असून
यामध्ये उपतालुकाप्रमुख/
तालुका संघटक/
गटप्रमुख / गणप्रमुख/
तालुका संपर्कप्रमुख/
तालुका प्रवक्ते (नेता)/
बुथ प्रमुख असून
निवडीचा निकष: निष्ठा आणि जनसेवेची ओढ असून
या निवडीबाबत बोलताना तालुकाप्रमुख सोपान( काका) मोरे यांनी सांगितले की, यामध्ये असे तरुण हवे आहेत की , ज्यांच्या मनात राजकारणाबरोबरच समाजकारणाची जिद्द आहे . घराणेशाहीच्या राजकारणाला छेद देऊन सामान्य कुटुंबातील कर्तबगार मुला-मुलींना आम्ही मानाच्या पदावर ती बसून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे सांगितले .
तसेच उपजिल्हाप्रमुख आजिनाथभाऊ खेडकर यांनी सांगितले की, सर्वांगीण विकास आणि सामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेचे हे व्यासपीठ तरुणांसाठी खुली संधी असून इच्छुक उमेदवारांनी तातडीने आपली नाव नोंदणी करावी.
तसेच अर्ज कोठे व कसा करावा-
व जे तरुण शिवसेनेच्या माध्यमातून जनसेवा करू इच्छितात, त्यांनी आपले बायोडाटा /अर्जासह खालील
शिवसेना संपर्क कार्यालय, कौशल्य बिल्डिंग (तळघर), बस स्टँड समोर, शिरूर कासार.
व थेट संपर्क--
सोपान (काका )मोरे (तालुकाप्रमुख)/
आजिनाथभाऊ खेडकर (उपजिल्हाप्रमुख)/
हारिमामा खेडकर किसान सेना तालुका प्रमुख /
साईनाथ ढाकणे युवा सेना तालुका प्रमुख लढायचं सामान्यांच्या न्यायासाठी, या मैदानात शिवसेनेच्या वतीने ब्रीदवाक्य घेऊन शिरूर कासारचा भगवा अधिक जोमाने फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जाहीर केले .
Comments
Post a Comment