गढी येथे १५ व्या वित्त आयोगातुन विविध विकास कामाचे युवा नेते रणविर (काका ) पंडीत यांच्या हस्ते लोकांअर्पण संपन्न

गढी येथे १५ व्या वित्त आयोगातुन विविध विकास कामाचे युवा नेते रणविर (काका ) पंडीत यांच्या हस्ते लोकांअर्पण संपन्न
सखाराम पोहिकर
गेवराई तालुका प्रतिनिधी

 गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथे दिनांक 27 12 2025 रोजी सकाळी 11 वाजता गेवराई तालुक्याचे युवा नेते माननीय रणवीर काका पंडित यांच्या हस्ते गढी येथे पंधराव्या वित्त आयोगातील सुमारे 12 लाख रुपयांचे कामाचे लोकार्पण करण्यात आले माननीय अमरसिंह पंडित यांच्या सूचनेनुसार व आमदार विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गढी गावात व रोड वरती होत असलेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गडी ग्रामपंचायतच्या वतीने एक नवीन घंटागाडी खरेदी करण्यात आली तसेच ज्या भागात पाणीपुरवठा केला जात नव्हता त्या भागात नवीन पाईपलाईन करून पाईप लाईन मध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्यात आली तसेच पाण्याच्या टाकीचा परिसर या ठिकाणी पेवर ब्लॉक टाकून सुशोभीकरण करण्यात आले तसेच गेल्या दोन वर्षापासून पाणीपुरवठा योजना सातत्याने चालू आहे आणि ती बंद पडू नये म्हणून काही नवीन मोटार खरेदी करण्यात आले आहेत तसेच समशान भूमी मध्ये रात्रीची लाईटची व्यवस्था नव्हती त्यासाठी हायमासक लावून ती करण्यात आली आहे आणि गावातील लोकांना कमी दरात स्वच्छ व निर्मळ पाणी मिळावे यासाठी बंद पडलेली फिल्टर योजना दुरुस्त करून एक रुपयात 15 लिटर पाणी देण्याचा शुभारंभ युवा नेते रणवीर काका पंडित यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे गेल्या काही दिवसापासून गावातील या कामाबद्दल माननीय अमरसि पंडित साहेब यांच्या सोबत चर्चा केल्या असता माननीय अमरसिंह पंडित साहेब यांनी सांगितले की हे सर्व कामे करून घे आणि आज ही सर्व कामे मार्गी लागली आहेत यामुळे गढी गावातील नागरिकांना या सर्व गोष्टीचा फायदा होणार आहे त्यामुळे त्यांनी माननीय अमरसिंह पंडित साहेब व माननीय आमदार विजयसिंह पंडित साहेब व युवा नेते रणवीर काका पंडित यांचे आभार मानले आहेत यावेळी गढी गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व युवक वर्ग मोठ्या संख्येने या लोक अर्पण सोहळ्यास उपस्थित होते व आलेल्या सर्व गावकऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार गढी ग्रामपंचायत चे सरपंच विष्णुपंत घोंगडे यांनी मांडले व कार्यक्रम संपला अशी जाहीर केले

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी