रोहन गलांडे पाटील यांच्या अमरण उपोषणाला यश !प्रशासनाने सर्वच मागण्या केल्या मान्य !


केज/प्रतिनिधी 
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील पत्रकार, संपादक समाजसेवक रोहन गलांडे पाटील यांनी १३ दिवस अमरण उपोषण केले व त्यांच्या मागण्या केज प्रशासनाने,प्रशासनाचा भाग तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, कृषी अधिकारी, ग्रामसडक योजना अधिकारी यांनी मान्य केल्या आहेत तसेच गावात दुःखत घटना घडली त्यामुळे उपोषण मागे घेतले या विषयी सविस्तर वृत्त असे की त्यांच्या मागणीनुसार चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम २० जानेवारी रोजी सुरू करण्यात येणार आहे असे पत्र त्यांना देण्यात आले आहे तसेच केज तालुक्यातील विहीर व गायगोठा, घरकुल योजनेचे हप्त्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे पत्र देण्यात आले आहे तसेच चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालयाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होती त्यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे त्यांची पुढील कार्यवाही उच्च शिक्षण संस्था अधिकारी यांच्या कडून करणार आहे असे रोहन गलांडे यांनी म्हटले आहे.तसेच केज तालुक्यातील महाडीबीटी योजनेची रक्कम देण्यास सुरुवात झाली आहे त्यांचे पत्र तालुक्याचा अहवालासह १० जानेवारी रोजी मिळणार आहे तसेच चिंचोली माळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या व जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी कीती निधी खर्च केला त्यांची चौकशी केली असुन खुप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस आला आहे तरी पुढील कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे तसेच चिंचोली माळी येथील गायरान परीसरातील सौरऊर्जा प्रकल्प काम १५ जानेवारी रोजी सुरू करण्यात येईल असे केज तहसीलदार यांनी म्हटले आहे तसेच मुख्य मागणी श्री संत नामदेव महाराज सभागृह ते नागबेट वस्ती अतिक्रमण हटविण्याचे काम व रस्ता व नालीचे काम काही कालावधीनंतर होईल असे पत्र प्राप्त झाले आहे तसेच काही मागण्या वर कार्यवाही सुरू आहे तरी रोहन गलांडे यांच्या सर्व मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत.तसेच रोहन गलांडे यांनी प्रसारमाध्यमांना संपादक, पत्रकार साथिदार अमरण उपोषणाला भेट देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत तसेच विरोध, बदनामी करणाऱ्यावर मी बोलावे ऐवढे विरोध त्या लायक नाही कारण मी त्यांना झेपलो नाही त्यांनी बदनामी केली माझे आंदोलन मोडून काढण्यासाठी मंत्र्यांची मदत घ्यावी लागली असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी