रमाई घरकुल योजनेतील खरेदीखत व पीआर कार्डची सक्ती रद्द करा; वंचित बहुजन आघाडीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
बीड प्रतिनिधी : रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांकडून खरेदीखत आणि पीआर कार्ड सादर करण्याची जाचक अट रद्द करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले. लाभार्थ्यांचा हक्काचा निधी थेट आरटीजीएस (RTGS) किंवा डीबीटी (DBT) पद्धतीने खात्यावर जमा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रमाई घरकुल आवास योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक निवास उपलब्ध करून देणे हा आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, या प्रवर्गातील नागरिकांचे जीवनमान उंचावून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे शासनाचे ध्येय आहे. मात्र, नगरपरिषदेकडून घातल्या जाणाऱ्या तांत्रिक अटींमुळे लाभार्थी योजनेपासून वंचित राहत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment