पाटोदा–आष्टी तालुक्यातील २४६ पोलीस पाटील पदांसाठी १ जानेवारीला आरक्षण सोडत
पाटोदा (प्रतिनिधी)पाटोदा उपविभागातील पाटोदा व आष्टी या दोन तालुक्यांतील एकूण २४६ पोलीस पाटील पदे सध्या रिक्त असून ही पदे भरण्यासाठी महिला ३० टक्के आरक्षणानुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय पाटोदा येथे होणार आहे. सदर आरक्षण सोडत प्रक्रियेकरिता इच्छुक नागरिकांनी दिलेल्या ठिकाणी व वेळेत उपस्थित राहावे,असे आवाहन उपविभागीय अधिकारी पाटोदा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment