राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले
बीड(प्रतिनिधी) राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जी संजीवा रेड्डी यांच्या व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.कैलास भाऊ कदम, यांच्या आदेशावरून इंटक बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी बीड तालुक्यातील नेकनूर येथील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता शेख सद्दाम शेख सखलैन यांना बीड उप तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व नियुक्तीपत्र देण्यात आले.नियुक्तीपत्र देतानी जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, जिल्हा सचिव सखाराम बेगंडे,शेख आमेर पाशा, राम चव्हाण तसेच बीड तालुका येथील उप तालुका अध्यक्ष शेख सद्दाम शेख सखलैन यांची निवड करण्यात आली.तरी यावेळी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्ह्यातील संघटित व असंघटित राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक चे पदाधिकारी यावेळी इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment