बीडचे विद्रुपीकरण थांबवा! अपघातांना आमंत्रण देणारी बॅनरबाजी बंद करा; ‘होर्डिंग्जमुक्तीचा नाशिक पॅटर्न’ तातडीने राबवा – डॉ. गणेश ढवळे

बीडचे विद्रुपीकरण थांबवा! अपघातांना आमंत्रण देणारी बॅनरबाजी बंद करा; ‘होर्डिंग्जमुक्तीचा नाशिक पॅटर्न’ तातडीने राबवा – डॉ. गणेश ढवळे

कायद्याला हरताळ, न्यायालयाचा अवमान! बीडमध्ये बॅनरबाजीचा कहर; नगरपरिषद कार्यालयासमोर संतप्त निदर्शने

नवनिर्वाचितांची सत्तेची धुंदी; बीड शहर बॅनरच्या विळख्यात! ‘नाशिक पॅटर्न’ची अंमलबजावणीची जोरदार मागणी

बीड :- (दि. २९)बीड शहरातील प्रमुख बाजारपेठा, मुख्य रस्ते व चौकांमध्ये विजेच्या खांबांवर, सिग्नलवर तसेच रस्त्याच्या दुभाजकांवर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी बॅनर रस्त्यावर झुकल्याने वाहनचालकांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

शहर स्वच्छता, सौंदर्यीकरण व नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या नगरपरिषदेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अनधिकृत बॅनरबाजीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘होर्डिंग्जमुक्तीचा नाशिक पॅटर्न’ बीडमध्ये तातडीने राबवावा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते व बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज नगरपरिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

निदर्शकांनी “बॅनरबाजी थांबवा” अशा घोषणा देत नगरपरिषदेच्या भूमिकेचा निषेध केला. यावेळी शैलेश फडसे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन सादर करण्यात आले.

या आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, शिवशर्मा शेलार, शेख मुबीन, शेख मुस्ताक,रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष – इंटक, बीड), आर .आर.जाधव, डी.जी.तांदळे( महाराष्ट्र राज्य किसान सभा बीड जिल्हाध्यक्ष), नितीन जायभाये (अध्यक्ष बीड शहर बचाव मंच),अँड . नितीन वाघमारे , रुक्मिणी नागापुरे सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.




 न्यायालयाच्या आदेशाची अवमानना

राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकांना शहर बॅनरमुक्त ठेवण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले असून त्यानुसार दरवर्षी पालिकांकडून शपथपत्र दाखल करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात बीडमध्ये बॅनरमुक्ती केवळ कागदोपत्रीच असून हे थेट न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. ही बाब गंभीर असून याला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.


---

 ‘नाशिक पॅटर्न’ बीडमध्ये राबवा – डॉ. ढवळे

नाशिक शहरात अनधिकृत बॅनर व होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर थेट बॅनरवर झळकलेल्या व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करत २१ पेक्षा अधिक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राज्यभर चर्चेचा विषय ठरलेला आणि कौतुकास्पद असा ‘होर्डिंग्जमुक्तीचा नाशिक पॅटर्न’ बीडमध्येही तातडीने राबवावा, अशी ठाम मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली.




नवनिर्वाचितांकडूनच नियमांना हरताळ

बीड नगरपरिषद निवडणुकीत जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच कायदे व नियम पायदळी तुडवल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. सर्वपक्षीय विजयी उमेदवारांनी सत्तेची धुंदी चढताच शहरभर अनधिकृत बॅनरबाजीचा कहर केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी