संत वामनभाऊ ५० वा पुण्यतिथी सोहळा तोंडावर, गहिनीनाथ गडाकडे जाणारा रस्ता मात्र खड्डेमय

संत वामनभाऊ ५० वा पुण्यतिथी सोहळा तोंडावर, गहिनीनाथ गडाकडे जाणारा रस्ता मात्र खड्डेमय

मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टरने येण्याएवजी गाडीने या व रस्त्याची वाट लागलेली पहा 
पाटोदा (प्रतिनिधी) चिचोली येथील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांचा ५० वा पुण्यतिथी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा सोहळा राज्यातील भाविकांसाठी श्रद्धेचा कार्यक्रम मानला जातो. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र एवढ्या मोठ्या व प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरही गहिनीनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून उखडलेला डांबराचा थर यामुळे वाहनचालकांसह पायी जाणाऱ्या भाविकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. हजारो भाविक या पुण्यतिथी सोहळ्यासाठी गडावर येणार असताना आणि मान्यवरांची उपस्थिती निश्चित असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर “मुख्यमंत्री साहेबांनी हेलिकॉप्टरने येण्याऐवजी गाडीने यावे व गहिनीनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था प्रत्यक्ष अनुभवावी” अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे.
पुण्यतिथी सोहळ्यापूर्वी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी