आमदार सुरेश धस यांच्या सूचनेला पाटोदा ग्राहक पंचायतचा प्रतिसाद
आमदार सुरेश धस यांच्या सूचनेला पाटोदा ग्राहक पंचायतचा प्रतिसाद
शासकीय कार्यालयात अडवणूक होत असल्यास संपर्क करा-विशाल देशमुख,अंगद सांगळे
पाटोदा (प्रतिनिधी):
पाटोदा तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत नागरिकांनी मांडलेल्या तक्रारीनंतर आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या कठोर सूचनांना राष्ट्रीय ग्राहक पंचायत,पाटोदा यांनी प्रतिसाद दिला आहे. तहसील कार्यालयात किंवा इतर शासकीय कामांसाठी कोणीही पैसे मागत असल्यास थेट गुन्हे दाखल करा आणि तहसील परिसरातील एजंटगिरीचा पूर्णपणे बंदोबस्त करा,या आमदार धस यांच्या सूचनेचे ग्राहक पंचायतने स्वागत केले आहे.ग्राहक पंचायतच्या वतीने सांगण्यात आले की, शासकीय सेवा मोफत असताना नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या एजंट व मध्यस्थांविरोधात संघटना आता सक्रिय भूमिका घेणार आहे. तहसील, महसूल, पंचायत समिती आदी कार्यालयांमध्ये नागरिकांना अडवणूक, विलंब किंवा पैशांची मागणी होत असल्यास अशा तक्रारी ग्राहक पंचायतकडे नोंदवाव्यात असे आवाहन ग्राहक पंचायतचे अध्यक्ष विशाल देशमुख व उपाध्यक्ष अंगद सांगळे यांनी केले आहे. पाटोदा तालुका राष्ट्रीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष : विशाल देशमुख,उपाध्यक्ष : अंगद सांगळे नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची योग्य ती नोंद ठेवून त्या थेट संबंधित वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यात येतील. दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास ग्राहक पंचायत लोकशाही मार्गाने आंदोलन उभारेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आमदार सुरेश धस यांच्या सूचनेनंतर ग्राहक पंचायतने घेतलेला हा पुढाकार पाटोदा तहसीलमधील एजंटगिरीविरोधातील लढ्याला बळ देणारा ठरणार आहे.
Comments
Post a Comment