केज प्रशासनाने रोहन गलांडे यांच्या उपोषणाचा निर्णय लावला नाही तर उद्रेक होण्याची शक्यता?,उपोषणा ११/१२ वा दिवस, जबाबदार कोण- रोहन गलांडे पाटील

 

केज / प्रतिनिधी
चिंचोली माळी ता.केज येथे विविध प्रलंबित नागरी व शासकीय मागण्यांच्या पूर्ततेसाठी रोहन गलांडे यांनी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. बुधवार दि.१७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७-३० वाजता संत नामदेव महाराज मंदिर येथे ते उपोषणास बसले आहेत.काही मागण्या मान्य झाल्या आहेत परंतु एक दोन मागणीसाठी रोहन गलांडे पाटील यांना जिवे मारायच ठरवले आहे असे चिन्ह दिसत आहेत कारण अमरण उपोषणाचा ११ वा दिवस आहे रोहन गलांडे पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे व रोहन गलांडे यांनी जनतेला शेवटचा रामराम घ्यावा असे म्हटले आहे.कारण त्यांना बोलताना छातीवर दाब येत आहे,डोके दुखी उम्मघाम होत आहे,छातीत दुखायला सुरुवात झाली आहे,अंग थरथरत आहे एवढ्या वेदना होतात परंतु प्रशासनाला काही घेणे देणे नाही परंतु रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे की मेलो तरी चालेल पण मागण्या मान्य झाल्या शिवाय अमरण उपोषण मागे घेणार नाही.या विषयी सविस्तर वृत्त असे की चिंचोली माळी येथील उर्वरित अतिक्रमण तात्काळ हटवून छत्रपती संभाजी महाराज चौक (नागबेट वस्ती) ते संत नामदेव महाराज मंदिरा पर्यंत रस्ता व नालीचे काम त्वरित सुरू करण्यात यावे,अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. मागणीही उपोषणातून करण्यात आली आहे.यासोबतच चिंचोली माळी ग्रामपंचायत हद्दीतील नामदेव महाराज परीसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी आता नऊ दिवस झाले अमरण उपोषणाला बसले आहेत.दि.११ डिसेंबर २०२५ रोजी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे सादर केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात मागण्यांसाठीच हे आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याचे रोहन गलांडे यांनी सांगितले आहे.मागण्या मान्य होई पर्यंत उपोषण सुरूच राहील,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

केज तहसीलदार यांनी बांधकाम पटेल साहेब यांनी ग्रामपंचायत सरपंच सुनील देशमुख यांनी ग्रामसेवक यांनी तातडीने उद्या अतिक्रमण काढण्यासाठी सुरवात केली तर ठीक आहे नाहीतर प्रशासनान जबाबदार राहतील परंतु मेलो तरी हरकत नाही दिलेला शब्द पाळवा.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी