पत्रकार संघ आणि आश्रय सेवा केंद्राच्या वतीने आयोजित

जगावेगळ आव्हान स्वीकारणाऱ्या बीडच्या पहिल्या मुळव्याध तज्ञ डॉ. मीरा ढाकणे नागरे यांना जागतिक स्त्रीरत्न पुरस्कार जाहीर 

बीड प्रतिनिधी 
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पत्रकार संघ आणि आश्रय सेवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जगा वेगळं आव्हान स्वीकारणाऱ्या मुली आणि महिलांना जागतिक स्त्रीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी बीड जिल्ह्यातील पहिल्या महिला मुळव्याध तज्ञ डॉक्टर मीरा प्रशांत ढाकणे नागरे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सावरखेड तेजन येथील मूळ रहिवासी असलेल्या डॉक्टर मीरा प्रशांत ढाकणे नागरे या सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मल्या. गावातील शेतकऱ्यांपैकी पहिल्या कन्या त्या डॉक्टर बनणाऱ्या ठरल्या. जगा वेगळ आव्हान स्वीकारून त्यांनी महिलांना जो मूळव्याधाचा त्रास होतो तो असह्य त्रास कमी करण्याचा निर्णय युवा दशेत घेतला आणि तो उच्च शिक्षण घेऊन पूर्ण केला. त्या जिद्दीने मुळव्याध तज्ञ परिपूर्ण तर झाल्याच पण येणाऱ्या नव्या पिढीतील मुलींना देखील त्यांनी डॉक्टर व्हायचं असेल तर महिला मूळव्याध तज्ञ व्हा असे आवाहन करत वेगळेपण जपलं आहे. आपल्या शेतकरी वडिलांची इच्छा पूर्ण करणाऱ्या आणि असह्य महिलांचे दुखणं कमी करणाऱ्या डॉ. मीरा प्रशांत ढाकणे नागरे यांनी स्वीकारलेले आव्हानात्मक वेगळेपण लक्षात घेऊन पत्रकार संघ आणि आश्रय सेवा केंद्राच्या वतीने येणाऱ्या 8 मार्च 2025 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानाचा देण्यात येणारा जागतिक श्रीरत्न पुरस्कार हा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात येणार आहे. असे आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा शेख आयेशा यांनी जाहीर केले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी