मुख्य अणुजीवशास्त्र जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाणी तपासणीसाठी चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्यात पाण्याचे नमुणे ; पाणी तपासणीवर प्रश्न चिन्ह :- डॉ.गणेश ढवळे
-
बीड:- (दि.२० ) बीड जिल्हा रुग्णालय आवारातील मुख्य अणु जीवशास्त्र जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाणी तपासणीसाठी चक्क दारुच्या रिकाम्या बाटल्यांत पाण्याचे नमुने घेण्याचा गंभीर प्रकार आढळून आला असुन काचेच्या बाटल्याची गरज असेल तर किमान प्रयोगशाळा प्रशासनाने त्या बाटल्याच्या झाकणावरील टँगो, बॉबी, संत्रा असे दारूचे लेबल तरी काढून वापरण्याची गरज आहे.त्यामुळे दारूच्या रिकाम्या बाटल्या योग्य रित्या निर्जंतुकीकरण करून वापरात घेतात की नाही? असा प्रश्न पडला असुन एकंदरीतच पाणी तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, रामनाथ खोड, शेख युनुस,सुदाम तांदळे, शेख मुबीन,शिवशर्मा शेलार, शेख मुस्ताक यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सचिव स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग मंत्रालय मुंबई, उपसंचालक आरोग्य सेवा राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा पुणे यांना केली आहे.
सविस्तर माहितीस्तव
बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पाठिमागील बाजूस असलेल्या पाणीतपासणी प्रयोगशाळेत चक्क देशीदारूच्या रिकाम्या बाटल्या पाण्याचे नमुणे ठेवल्याचे दिसून आले. सदरील बाटल्या योग्यरित्या स्वच्छ करून प्रयोगशाळा प्रशासन वापरात घेत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला असून त्या बाटल्याच्या झाकणावर टँगो, बॉबी, संत्रा लिहिलेले लेबल तरी काढून प्रयोगशाळा प्रशासनाने अशा बाटल्यांचा वापर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. पाणी तपासणी प्रयोगशाळेतून जिल्ह्याच्या आरोग्याचा प्रश्न अवलंबून असतो. पाणी योग्य आहे की अयोग्य आहे या अहवालावर बीडचे नागरिक व ग्रामस्थ पाण्याचा वापर करतात. जर अशाप्रकारे दारूच्या बाटल्यात पाणी नमुणे तपासणी होत असेल तर ही बाब गंभीर आहे. प्रयोगशाळा प्रशासन या दारूच्या रिकाम्या बाटल्या योग्यरित्या स्वच्छ करत असतील का? असाही प्रश्न सर्वसामान्यांना पडला असून दारूचे लेबल पाहून पाण्याच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याची जिल्हाधिकार्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे.
प्रयोगशाळेवर लाखोंचा खर्च तर मग रिकाम्या दारूच्या बाटल्यात पाणी तपासणी का?:- डॉ.गणेश ढवळे
प्राथमिक आरोग्यकेंद्र, खासगी शाळा, तसेच शहरातील हॉटेल व इतर सार्वजनिक ठिकाणी वापरात असलेले पाणीनमुणे या प्रयोगशाळेत तपासणीसाठी येतात. पाणीतपासणीवर प्रयोगशाळा प्रशासन लाखो रुपये खर्च करत असावे तसेच या पाणीनमुणे तपासणीवर लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्या दृष्टीकोनातून उपसंचालक पुणे यांनी पाणी तपासणीसाठी काचेच्या बाटल्या उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु प्रयोगशाळा प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसत असून अशाप्रकारे देशीदारूच्या रिकाम्या बाटल्यात पाणीनमुणे तपासणीसाठी घेणे योग्य आहे का? याचा प्रयोगशाळा प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे.
Comments
Post a Comment