अखेर शालेय विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशाची प्रतिक्षा संपली ; प्रजासत्ताक दिन नविन गणवेशात साजरा होणार ; सरकारला ऊशिरा का होईना शहाणपण सुचले आणि गणवेशाची जबाबदारी शालेय व्यवस्थापनावर

अखेर शालेय विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशाची प्रतिक्षा संपली ; प्रजासत्ताक दिन नविन गणवेशात साजरा होणार ; सरकारला ऊशिरा का होईना शहाणपण सुचले आणि गणवेशाची जबाबदारी शालेय व्यवस्थापनावर :- डॉ.गणेश ढवळे 
बीड:- ( दि.१७ ) समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी मधील सर्व मुली, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. सन २०२४-२५ मध्ये "एक राज्य एक गणवेश " योजना राबविण्यात आली. यात अनेक मुलांना स्वातंत्र्य दिन जुन्या गणवेशावर साजरा करावा लागला तर दिवाळीनंतर शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिने उलटूनही दुसऱ्या गणवेशाची प्रतिक्षा होती. संबंधित प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे यांनी गतवर्षी प्रमाणेच गणवेशाचे कामकाज शालेय व्यवस्थापन समिती मार्फत करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळेल यासाठी जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) जिल्हा परिषद बीड यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी करत आंदोलनाचा ईशारा दिला होता.त्यानंतर शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी दीड कोटीचा निधी सीईओंच्या मान्यतेने गटशिक्षणाधिकारी यांना पीएफएमएस प्रणाली द्वारे वर्ग करण्यात आला आणि आज अखेर शालेय विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळाला आहे.त्यामुळे प्रजासत्ताकदिन विद्यार्थ्यांना गणवेशात साजरा करता येणार आहे.आज दि.१७ शुक्रवार रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश केंद्रीय जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसऱ्या शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक आबासाहेब हांगे,सहशिक्षक अमर पुरी,संदिपान आगम, माधुरी कुलकर्णी, सुवर्णा अयाचित आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे व पत्रकार हरीओम क्षीरसागर उपस्थित होते.

सरकारला ऊशिरा सुचलेले शहाणपण ; विद्यार्थ्यांना मापाचे ड्रेस मिळणार ; गणवेश वितरणाची जबाबदारी शालेय व्यवस्थापन समितीवर :- डॉ.गणेश ढवळे 

सन २०२४ -२५ मध्ये " एक राज्य एक गणवेश" योजना राबविण्यात आली.पहिल्या गणवेशासाठी गणवेशाचा थेट कटींग कपडा पुरवठा करून तो बचतगटांमार्फत शिलाई करून घेण्यात आला.परंतु विद्यार्थी संख्या पाहता गणवेश शिलाईसाठी यंत्रणा अपुरी पडली त्याच बरोबर एकाच वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच मापाचे गणवेश देण्यात आले होते त्यामुळे काहींना आपरे तर काहींना ढगळे होत असल्याने गणवेश मिळुनही विद्यार्थ्यांकडुन ते घालण्यात येत नव्हते.नविन वर्षांपासून शासनाने गणवेश वितरणाची जबाबदारी पुन्हा शालेय व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आल्याने येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्य मापाचे गणवेश मिळणार आहेत.त्याच बरोबर स्थानिक विक्रेते किंवा गणवेश शिलाई करून देणारे बचतगट,टेलर यांना रोजगार मिळणार आहे . त्यामुळे ऊशिरा का होईना सरकारला शहाणपण सुचले याबद्दल डॉ.गणेश ढवळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बीड जिल्ह्यातील शालेय गणवेशासाठी दीड कोटीचा निधी बीईओंकडे वर्ग :- भगवान फुलारी, शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प.बीड

बीड जिल्ह्यातील योजनेत पात्र १ लाख ४४ हजार ३१५ विद्यार्थ्यांच्या स्काऊट गाईड व अनुरूप गणवेश शिलाईची रक्कम प्राथमिक शिक्षण परीषदेकडुन मंजूर करून प्रतिगणवेश संच शिलाई १०० रूपये व अनुषंगिक खर्च म्हणून १० रूपये असे एकूण ११० रूपये याप्रमाणे १ कोटी ५८ लाख ७४ हजार ६५० रूपयांचा निधी शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) जिल्हा परिषद बीड भगवान फुलारी यांनी सीईओंच्या मान्यतेने गटशिक्षणाधिका-यांना पीएफएमएस प्रणालीद्वारे वर्ग केल्याचे सांगितले.

कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी आणि निधी 

तालुका आंबेजोगाई गणवेश व लाभार्थी ११,०४५ , वितरित निधी १२, १४,९५० तालुका आष्टी गणवेश व लाभार्थी १६,१२१ वितरित निधी १७,७३,३१० तालुका बीड गणवेश व लाभार्थी २४,५२७ वितरित निधी २६,९७,९७० तालुका धारूर गणवेश व लाभार्थी ८,७८६ वितरित निधी ९,६६,४६० गेवराई तालुका गणवेश व लाभार्थी २३,०३१ वितरित निधी २५,३३,४१० केज तालुका गणवेश व लाभार्थी १४,०८४ वितरित निधी १५,४९,२४० परळी तालुका गणवेश व लाभार्थी ९,००६ वितरित निधी ९,९०,६६० पाटोदा तालुका गणवेश व लाभार्थी ७,९०८ वितरित निधी ६,६९,८८० शिरूर तालुका गणवेश लाभार्थी ६,८५९ वितरित निधी ७,५४,४९० वडवणी तालुका गणवेश व लाभार्थी ६,८८६ वितरित निधी ७,५५,२६० ईतका निधी वितरित करण्यात आला अस
आहे . स्काऊट गाइड व अनुरूप गणवेश शिलाई प्रति गणवेश ११० रूपये याप्रमाणे लाभार्थी संख्येनुसार वितरित करण्यात आले आहेत.या निधीचा विनियोग गणवेश शिलाईच्या कामासाठीच करावा.गणवेश शिलाईचे देयक प्राप्त झाल्यानंतरच निधी अदा करावा.अनियमितता होणार नाही व कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बीड भगवान फुलारी यांनी सर्व गटशिक्षणाधिका-यांना दिले असल्याचे सांगितले.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी