ईगतपुरी आगाराच्या लालपरीचा बैलगाडी प्रमाणे संथ प्रवास ?प्रवासी म्हणतात बसचा प्रवास नको रे बाबा?


ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन

   आधुनीक युगात वेळेला खुप महत्त्व आहे.तास,मिनिटे आणि सेंकदाची वेळ सुद्धा खुप महत्त्वाची आहे.वेळेचे हे गणित गाठण्यासाठी एकिकडे भारतात हायस्पीड बुलेट ट्रेन सह विविध प्रवासी साधनाची नेत्रदिपक निर्मिती व जलदगती प्रवासाचा टप्पा गाठत असतानांच ईगतपुरी सारख्या आदिवासी व अतिदुर्गम तालुक्यात मात्र एस.टी.बसेसचा प्रवास अक्षरश; बैलगाडीच्या संथगतीने सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.यामुळे शासनाच्या विविध सवलती असतानांही संथगतीचा प्रवास करण्याऐवजी प्रसंगी दुप्पट पैसे देऊन खाजगी वाहनानीं प्रवास करणे प्रवासी पसंत करत आहे.
  किमान पंधरा वर्ष जुनी झालेली वाहने मोडित काढण्याचा शासकीय नियम असतानांही आदिवासी भागात कोण बघतयं ? तिथं कोण भांडणार आहे ? सगळं धकुन जातयं या मानसिकतेतुन शहरी भागात प्रवासी वाहतुकीसाठी बाद झालेल्या जीर्ण, शीर्ण व अक्षरश भंगारात निघणार्या बसेस आदिवासी भागाच्या माथी मारल्या जात आहे हे वास्तव आहे.जीर्ण, शीर्ण व भंगार गाडयानां दुरुस्ती वगैरे न करता केवळ रंगरंगोटी केली जाऊन आदिवासी भागात या गाडया पाठवल्या जातात.यात ही मोठे गौडबंगाल असल्याची खमंग चर्चा असुन मोठया प्रमाणात वरिष्ठ आधिकारी आपले उखळ पांढरे करुन घेत असल्याची चर्चा आहे.या संबधित वरिष्ठ आधिकार्याचींही चौकशी होणे गरजेचे आहे.
  दरम्यान एकिकडे गाडयाचीं ही परवड असतानां शालेय फेरी साठी मानव विकास धनच्या बसेस शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या असतानांही या बसेस भलतीकडेच धंदा करत फिरत असल्याचा आरोप अनेक पालकानीं केला आहे.
   मा.जिल्हाधिकारी यांचे या बाबत सक्त निर्देश असतानांही ते सगळे धाब्यावर बसवुन अनागोंदी कारभार सुरु आहेत. आदिवासी भागातील विदयार्थ्यानां शिक्षणापासुन दुर करण्याचे काम आगार करते आहे कि काय ? असा सवाल नागरिक करत आहे.


आगाराच्या वरिष्ठाचीं चौकशी करा- गायकर यांची मागणी
   आदिवासी व अतिदुर्गम भागात प्रवासासाठी सुव्यवस्थित बसेस उपलब्ध करुन देणे गरजेचे असतानां परिवहन विभागाचे वाहतुक निर्देश चक्क सरकारी विभागच पायदळी तुडवत आहे.
  पंधरा वर्षापेक्षा जास्त जीर्ण, शीर्ण बसेस आदिवासी भागाच्या माथी मारल्या जात आहे .परिवहन विभाग केवळ खाजगी गाडयावरच कारवाईसाठी आहे का ? प्रवाशाच्यां जीवाशी बिनदिक्कितपणे खेळणार्या एस.टी आगारावर कधी कारवाई करणार ? 
  दुरुस्तीच्या नावाखाली लाखोचा मलिदा खाणार्या आगारातील भ्रष्ट आधिकार्यावर कधी कारवाई होणार ?
नवनाथ अर्जुन पा. गायकर
सामाजिक कार्यकर्ते

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी