लिंबागणेश येथील रोहित्रामध्ये बिघाड ; उच्चदाबाच्या वीजेमुळे घरगुती विद्युत उपकरणांचे नुकसान ; रिकाम्या खुर्चीला हार घालुन ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला
लिंबागणेश:- ( दि.२२ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बसस्थानकावरील रोहित्राचा अचानक बिघाड झाल्याने अचानक उच्चदाबाच्या विजेमुळे अनेक घरातील घरगुती विद्युत उपकरणे जळुन ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा या झाडाझुडपातून आलेल्या असुन वारंवार तांत्रिक बिघाड होत असुन महावितरण कडुन योग्य देखभाल दुरुस्ती करण्यात येत नाही.गेल्या ३ महिन्यांपासून लिंबागणेश येथील सहाय्यक अभियंता पद गेल्या ३ महिन्यांपासून रिक्त असुन चौसाळा येथील सहाय्यक अभियंता अभिजित शिंदे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. दीड महिन्यांपूर्वी रिक्त पद भरण्यात यावे यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.अखेर आज डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी श्रीफळ फोडून रिकाम्या खुर्चीला हार घालुन निषेध व्यक्त केला.यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, माजी सरपंच मंडलिक , विक्की आप्पा वाणी, संतोष वाणी,संतोष भोसले, अशोक जाधव,संजय घोलप,रामकिसन गिरे,संजय सुकाळे, चंद्रकांत आवसरे, सर्जेराव मुळे, गणेश घाडगे, अनिल ढवळे , अशोक ढास आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
आठवडाभरापासून शेतीला तर दुरच पण जनावरांना पाणी नाही:- रामकिसन गिरे
बसस्थानक येथील रोहित्रामध्ये गेल्या आठवडाभरापासून बिघाड असल्याने शेतीला पाणी देणे तर दुरच पण जनावरांना पाणी पाजण्याची अडचण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण तातडीने दुर करावी.
महावितरणने तातडीने दखल न घेतल्यास तिव्र आंदोलन :- रविंद्र निर्मळ ( सेवा सोसायटी चेअरमन लिंबागणेश)
महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थ हैराण असुन त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो.विद्युत कर्मचारी मुख्यालयी रहात नाहीत त्यामुळे रात्री अपरात्री बिघाड झाल्यानंतर ग्रामस्थांनाच दुरुस्ती करावी लागते. तातडीने महावितरणने उपाययोजना न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही महावितरणला देत आहोत.
३ महिन्यांपासून सहाय्यक अभियंता पद रिक्त असल्याने रिकाम्या खुर्चीला हार :-
लि़बागणेश येथील ३३ केव्ही केंद्रातील सहाय्यक अभियंता पद ३ महिन्यांपासून रिक्त आहे.दीड महिन्यांपूर्वी मांजरसुंभा ते पाटोदा राज्य मार्गावरील लिंबागणेश बसस्थानक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा तातडीने पदाची भरती करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. बसस्थानक येथील रोहित्रात बिघाड असल्याने घरामधील विद्युत उपकरणांमध्ये वीजप्रवाह उतरत आहे त्यामुळे भविष्यात जीवघेणा धोका उद्भवू शकतो याची गांभीर्याने दखल घ्यावी यासाठी आज रिकाम्या खुर्चीला हार घालुन निषेध व्यक्त केला.
Comments
Post a Comment