महाराष्ट्र शासनांने नेमलेल्या न्यायालयीन चौकशी समितीत बीड जिल्ह्याच्या विविध अत्याचारीत नागरीकांना त्यांची समस्या मांडण्याची संधी द्यावी- माजी सैनिकप्रकाश वाघमारे



बीड - मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र शासनाने न्यायालयीन चौकशी समिती नेमल्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय कौतुकस्पद आहे. परंतू बीड जिल्ह्याला बिहार राज्याच्या कारभाराशी जोडले जात असल्यामुळे संतोष देशमुख प्रकरणा व्यतिरिक्त पुर्वीच्या व नव्या अनेक गंभीर घटना या जिल्ह्यात आहेत. ज्यांचा संबंध तस्करी, गुंडगिरी, खंडणी, पोलीस अत्याचार व येथील प्रशासन राजकारणी, लोकप्रतिनिधी यांच्या अवैध प्रकारावर आक्षेप आहेत याचा आवाज उठवणाऱ्या नागरीकांवर अमानुष अत्याचार तसेच सतत गंभीर स्वरुपात अपराध वाढ होत आहेत. याचा बंदोबस्त करण्याची नामी संधी न्यायालयीन चौकशी समिती प्रमुख न्यायमुर्ती एम. टहलियान यांच्या समोर मांडणीची मुभा महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावी, अशी विनंती आहे. अशी सहमती शासनाने दिल्यास अनेक होणारे अनर्थ, अत्याचार टळतील व बीडच्या गुन्हेगारी वृत्तीला आळा बसेल, होणाऱ्या घटना टळतील.

या न्यायालयीन चौकशी समितीच्या कार्यकाळाला संलग्न मदतगार महिला आयोग, मानवी हक्क आयोग, अनुसूचित जाती आयोग, लोक आयुक्त, लोकपाल असा अनेक कायदेतज्ञ जनहित संस्थांना एक आठवड्याच्या मुदतीत कार्य करण्याचे आदेश सुनिश्चित करावेत, लोकांच्या तक्रारी या कार्यकारी संस्थाकडे बीड जिल्ह्यात मांडू द्याव्यात. तसेच सामान्य प्रशासन प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांचा दौरा ही निश्चित करण्यात यावा. यापूर्वी एक दोन जिल्हाधिकारी यांनी या जिल्ह्यात कार्यदक्ष काम केल्याचे दिसून येते. बहुतांश जिल्हाधिकारी यांनी बीडची अधोगती केल्याची दिसून येते. आजमित्तीला बीडचे कर्मचारी अधिकारी, ऑफीसमध्ये वेळेवर येत नाहीत. पाच दिवसाचा आठवडा केला असतानी व 9 वाजता कार्यालयात हजर राहाण्याचे आदेश असतानी 11 च्या नंतर ऑफीसला येत आहेत. दुपारी 2 ते 4 भोजन मिटींग बैठका दोन ते तीन घंटे किंवा दिवसभर घेतात, प्रशसानाचा धाक नाही. सध्या तर सर्व अधिकारी, कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम वर खेळ खेळत आहेत. मुख्यमंत्री महोदयांना विनंती की, न्यायालयीन चौकशी समितीशी विचार विनीमय संवाद बीड जनतेला मांडण्याची संधी द्यावी. मला या समिती समोर माझे म्हणणे मांडावयाचे आहे, असे प्रतिपादन माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी केले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी