बोगस पिक विमा भरणाऱ्या महा-ई-सेवा केंद्र व संबंधित व्यक्तीवर चौकशी करु गुन्हे दाखल करा शेकापची मागणी
बोगस पिक विमा भरणाऱ्या महा-ई-सेवा केंद्र व संबंधित व्यक्तीवर चौकशी करु गुन्हे दाखल करा शेकापची मागणी.
जिल्ह्यात आयत खाऊ लोकांमुळे प्रमाणिक शेतकरी आत्महत्या करतोय - भाई मोहन गुंड
शासनाच्या जमिनीवर ६८० बोगस खातेदारानी विमा भरला विमा.
केज ( प्रतिनिधी )
जिल्हात मोठ्या प्रमाणात बोगस शेतकऱ्यांच्या नावे पिक विमा भरला गेला. त्याच आनुसंगाने केज तालुक्यामध्ये देखील 2023 या कालावधीत,केज तालुक्यात 80 % गावात पिक विमा भरला गेल्याच समोर आलं आहे, ग्रामपंचायत गायरान जमीन, शासकिय जमीन, लघु पाटबंधारे जमीन, देवस्थान व पडीक क्षेत्रात जवळपास ६८० खातेदार आहेत. वेगवेगळ्या नावाने पिक विमा भरला गेला आहे, ते केज तालुक्यातील लोक नाहीत. हे लोक कुठले यांची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, या मुळे प्रामाणिक शेतकऱ्याच्या हक्काचा पिक विमा आयत खाऊ लोकांना जातो या मुळे प्रमाणीक शेतकरी जिल्ह्यात आत्महत्या करत आहे असा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी निवेदनात म्हटलं आहे. ज्या महा-ई-सेवा केंद्रावरून संबंधित बोगस शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्या बोगस शेतकऱ्यावर व महा-ई-सेवा केंद्रावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाई मोहन गुंड यांनी दिला आहे. आसे पत्र मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, कृर्षी मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हा अधिकारी बीड, जिल्हा कृषि अधिकारी बीड, तहसीलदार केज , तालुका कृषी अधिकारी केज, यांना दिले आहे निवेदनावर भाई मोहन गुंड, भाई मंगेश देशमुख अशोक रोडे, सुदर्शन देशमुख, महेश गायकवाड ईतर...
Comments
Post a Comment