वीजग्राहकांना महावितरण कडून नवीन वर्षात शॉक शेवगाव शहरात व तालुक्यात प्रीपेड स्मार्ट मीटर बसवायला सुरुवात
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
या बाबत सविस्तर वृत्त असे की वीज चोरी वीज गळती आणि आकडे यांना आळा घालण्यासाठी महावितरण च्या शेवगांव शहर आणि ग्रामीण कार्यालयाने घरगुती वापर व्यापारी वापर आणि शेतकऱ्यांसाठी स्मार्ट मीटर बसवण्याची योजना आणली असुन शहरात आणि तालुक्यात अनेक ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरु झाले आहे शेतकरी व सर्वसामान्यां चे आधीच कंबर मोडलेले त्यातच रिचार्ज संपण्याच्या आत बिल न भरल्यास अंधारात काढावे लागणार दिवस "शेतकरी व सर्वसामान्यां ना महिन्याला किंवा वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे महावितरणने स्मार्ट मीटर बसवून गरिबांची शोषण करू नये! "जुने मीटर व नवीन मीटर याचे सारखे रिडींग पडते का? की नवीन मीटर फास्ट पळतेB पाहिल्या शिवाय महावितरण नवीन प्रीपेड मीटर बसवू नये जिल्ह्याच्या ठिकाणी स्मार्ट प्रीपेड मीटरची योग्य चाचणी झाल्या शिवाय तालुका व ग्रामीण भागामध्ये मीटर बसऊ नये अशी मागणी ग्रामीण आणि शहरी भागात होऊ लागली आहे
Comments
Post a Comment