परळी नगरपरिषदची क्रीडा क्षेत्रात झेप" विभागात द्वितीय
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
राज्य प्रशासनाच्या वतीने प्रत्येक वर्षी प्रशासकीय कर्मचारी यांना एक प्रोत्साहन म्हणून कर्मचारी खेळाडूंना शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात याचाच भाग म्हणून बीड जिल्हा प्रशासन मार्फत बीड येथील जिल्हा क्रीडांगण जिल्हाधिकारी येथे कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या या मध्ये परळी नगर परिषदने प्रथम क्रमांक पटकावला होता सर्व युवा कर्मचारी खेळाडुन सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले होते नंतर पुढील स्पर्धे करिता संभाजी नगर विभागीय स्तरावर सुद्धा दुसरा क्रमांक पटकावला असून विभागात द्वितीय बक्षीस देण्यात आले आहे या युवा कर्मचारी खेळाडूंनी परळी नगर परिषदला विभागात द्वितीय बक्षीस मिळवून दिल्या बद्दल नगर परिषदचे मुख्याधिकारी कांबळे साहेब यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे सर्व खेळाडूंना पुढे भविष्यात ही असेच प्रोत्साहन देत रहाणार असे म्हंटले आहे तर या कबड्डी स्पर्धेत युवा कर्मचारी खेळाडू म्हणून समाधान समुद्रे ,शरणम ताटे,दशरथ जगतकर ,विजय कांबळे प्रकाश क्षीरसागर ,राहुल वैध्य कीर्तिमहान जोगदंड ,निखिल वाघमारे ,संघानंद कांबळे ,सतीश गोखले आदी होते तर यांना मार्गदर्शन नगर परिषदचे उपमुख्याधिकारी संतोष रोडे साहेब यांनी केले आहे...
Comments
Post a Comment