पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजितदादा पवार यांचा डॉ.योगेश क्षीरसागरांकडून सत्कार
बीड (प्रतिनिधी)
दि.१९ : शिर्डी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाली. त्याबद्दल पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सत्कार केला.
बीड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्यावतीने अजितदादा पवार यांचे अभिनंदन केले. त्यांचा प्रशासनातील दांडगा अनुभव व कणखरपणा बीड जिल्ह्याला प्रगतीपथावर घेवून जाण्यास नक्की मदत करेल, असा विश्वास डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment