सात गावाचा लाईट सुरळीत करा- राजेंद्र आमटे
नवीन मंजूर 5 mvp ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसावा
बीड जिल्हा (प्रतिनिधी--- गोरख मोरे) :
गेली चार पाच वर्षा पासून खांडे पारगाव परिसरातील खांडे पारगाव, अंथरवान प्रिंप्री, नागपूर खुर्द, उमरद खालसा, नागपूर बुद्रुक, उमरी, अंथरवण पिंप्री तांडा या सात गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही , शेतकऱ्यांना उच्च दाबाने विद्युत पुरवठा होत नाही . सात गावात लाईट रोज रात्री चार ते पाच तास लाईट नसते , वारंवार पाठपुरावा करून हि १९७० ते ८० च्या दशकातील विद्युत तारा बदललेल्या नाहीत . दर रोज लाईट फॉल्ट होत असून , सात गावांनी पाठपुरावा करून 5mvp चा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर होऊन हि बसवला जात नाही . तो तत्काळ बसवण्यात यावा, व सात गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणी साठी अधीक्षक अभियंता महावितरण जालना रोड येथे निवेदन देण्यात आले . नवीन मंजूर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा, जुन्या तारा बदलून नवीन तारा बसावा, शेतकऱ्यांना उच्च दाबाने विद्युत पुरवठा करण्यात यावा , अन्यथा सात गावातील शेतकऱ्यांना सह नागरिक तीव्र आंदोलन करतील असा इशारा शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, यांच्या सह अंगद आमटे, दीपक आमटे, प्रवीण आमटे, तेजस आमटे, चेतन आमटे, जालिंदर सोळुंके, श्रीराम खुरणे, प्रवीण शिंदे, आकाश टेकाळे, खाजा भाई पठाण, यांच्या वतीने समधित अधिकार्यांला निवेदन देऊन इशारा देण्यात आला असल्याचे प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात शिवसंग्राम शेतकरी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र आमटे बीड यांनी सांगितले आहे .
Comments
Post a Comment