खेळ कुस्तीच्या माध्यमातून तरुणांच्या कलागुणांना वाव देणारा एकमेव नेता - बाजीराव चव्हाण
तरुणांना खेळ कुस्तीच्या प्रवाहातून क्रीडा क्षेत्रात आवड निर्माण व्हावी हाच माझा द्यास.
बीड जिल्यातील तरुणांमध्ये खेळ कुस्तीची आवड निर्माण व्हावी करता बाजीराव दादा चव्हाण यांच्यामार्फत बीड येथे बाहुबली खेळ कुस्त्यांचा दांडगा सामना.!
बीड प्रतिनिधी : वेळ ही जीवनात प्रत्येकाला एकदा संधी देते. मात्र त्या संधीच सोन त्याच वेळेत कसं करता येईल हे आपल्या कर्तुत्व व जिद्दीवर नेहमी अवलंबून असते. अशीच संधी खेळाच्या माध्यमातून मी माझ्या बीड जिल्यातील तरुनां साठी उपलब्ध करत आहे. जेणेकरून माझ्या बीड जिल्ह्यातील ग्रामीण भाग असो वा शहर या प्रत्येक भागातील तरुण खेळाडू आपल्या खेळाच्या माध्यमातून मिळालाल्या संधीच सोन करू शकेल. तसेच आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करून जगासमोर स्वतःचं भवितव्य निर्माण करून दाखवेल. आणि तो खेळाडू येथूनच पुढे जाण्याची प्रेरणा मिळवून पुढे जाऊ शकेल हाच माझा यामागे उद्देश आहे. याच अनुषंगाने मी त्यांच्या कलागुणांना खेळ व कुस्तीच्या माध्यमातून याच कुस्तीच्या माध्यमातून एक संधी उपलब्ध करून देत आहे. कारण खेळ कुस्तीच्या माध्यमातून ते स्वतःला राज्य, व राष्ट्रीय, पातळीवर घेऊन जाऊन आपल्या जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यचे तसेच भारत देशाचे नाव उज्वल करतील या हेतूने महाराष्ट्राचे आरोग्य दूत बाजीराव (दादा) चव्हाण हे नेहमी कुठल्या ना कुठल्या खेळ कुस्तीच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यावेळीही खेळ कुस्त्याचं आयोजन मेडची देवी यात्रे निमित्त मोज्जे भंडारा वाडी, ता, जि, बीड येथे आयोजित केले आहे. वार बुधवार, दिनांक २२ रोजी या ठिकाणी हा भव्य दिव्य कुस्त्यांचा सामना आयोजित केला आहे. तरी कुस्त्यांचा वेळ दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत राहील अशी माहिती आयोजक बाजीराव (दादा) चव्हाण मित्र मंडळ तथा समस्त गावकरी भंडारवाडी तालुका जिल्हा बीड यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment