"आमदाराने" गेल्या पाच वर्षात मुस्लिम बहुल वार्डांसाठी काय केले ? - नितीन जायभाये
"आमदाराने" गेल्या पाच वर्षात मुस्लिम बहुल वार्डांसाठी काय केले ? - नितीन जायभाये
("आ.क्षीरसागर" यांना बीड शहर बचाव मंचाने मागितला गेल्या पाच वर्षाचा आढावा)
मुस्लिम बहुल वार्डांमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य साफसफाई च्या नावाने सातत्याने दुर्लक्ष व बोंब. मुस्लिम वार्डांमध्ये जाणीवपूर्वक क्षीरसागरांचे दुर्लक्ष"एक" रुपयाचे ही गेल्या पाच वर्षात कुठेही काम नाही. फक्त निवडणूक आली की मतांसाठी मुस्लिम बांधवांची आठवण येते. विकासाची कुठलीही तळमळ नसल्याने सर्व नगरसेवक सोडून गेले मुस्लिम बहुल भागांमध्ये मानव जीवनस्तर कमालीचा ढासळला आहे ही आमदारांचीच कृपा. आमदार कृपेने शहरातील विस्तारित मुस्लिम भागांमध्ये सगळीकडे लाईटच्या समस्या,लोक अंधारात आहेत. नुसती उद्घाटन- नुसती नारळ एकही काम केले नाही. एखाद-दुसरे केलेले काम तेही अपूर्णच. काही मुस्लिम भागांमध्ये अजून नाल्या व रस्तेच झालेले नाहीत.
बीड प्रतिनिधी -
गेल्या दोन वर्षापासून सातत्याने मी व आमचे सहकारी सर्वच मुस्लिम बहुल वॉर्डांमध्ये दौरे करत आहोत. या मुस्लिम बहुल वार्डांमध्ये कुठेही विकासाची कामे होत असताना दिसत नाहीत. सुव्यवस्थित नाल्या नियोजनाच्या व साफसफाई अभावी प्रचंड घाणीचे साम्राज्य कायम या सर्व भागांमध्ये पसरलेले दिसते. यामुळे मुस्लिम समाजातील लहान मुले, महिला व सर्व नागरिक सतत साथीच्या रोगांचे शिकार ठरत आहेत. दुर्गंधी व घाणीच्या साम्राज्यात वावर हा आयुष्यभर त्यांच्या पाचीला पुंजलेला आहे. या सर्व कारभाराला व परिस्थितीला जिम्मेदार कोण.? मतं घेऊन आमदार होताना, आमदारकी भोगताना फार आनंद वाटतो पण ज्यांची मते घेतली त्यांच्या भागांचा विकास कोण करणार.? त्यांच्या मूलभूत सोयीसुविधीचं काय? पाच वर्षात कधीतरी नगरपालिकेत एकदा तासभर दौऱ्याचं नाटक करून चार कागद चाळून आढावा मागितल्याने विकास होत नसतो. त्यासाठी सातत्याने जाणिवेने विकास कामांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणे, मिळालेल्या निधीमध्ये काम करताना टक्केवारी न मागणे,निधी आणून योग्य पद्धतीने त्याचा वापर करून लोकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे,भ्रष्टाचार मुक्त विकासाची कामे करणे, कामे अपूर्ण स्थितीत न सोडणे, कामांच्या दर्जा विषयी जागरूक असणे, वार्डा-वार्डा मध्ये फिरून लोकांच्या अडचणी सातत्याने जाणून घेणे, त्यावर सतत उपायोजना करत राहणे अशा अनेक बाबींचा त्यामध्ये समावेश असतो. दुर्दैवाने आपल्याकडे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असं काही काम करताना कधीच दिसत नाहीत.
एकाच घराण्याकडे सातत्याने अनेक वर्षापासून सत्ता असल्याकारणाने त्यांनाही लोकांच्या अडीअडचणी गरजा समस्या प्रश्न याविषयी जाणीव व गांभीर्य राहिलेले नाही. सत्ता म्हणजे आपलीच मक्तेदारी हा अविर्भाव त्यांच्यात निर्माण झाला आहे. ही मानसिकता बदलल्याशिवाय बीड शहराचा विकास अशक्य आहे. बीड शहर बचाव मंचाने आधी गेलेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा द्या व नंतर शहरात फिरा असे निर्देश दिले आहेत.
Comments
Post a Comment