निता अंधारे व बीड न.प.प्रशासन जाणीवपूर्वक १००% हलगर्जी व निष्क्रिय - नितीन जायभाये

निता अंधारे व बीड न.प.प्रशासन जाणीवपूर्वक १००% हलगर्जी व निष्क्रिय - नितीन जायभाये


 बीड प्रतिनिधी - 
 बीड शहर बचाव मंचाची शहरात सर्वत्र पाहणी व लोकसंवाद सुरू 

  बीड न.प.ची यंत्रणा पूर्णतः कोलमडली बीड शहराची सर्वत्र अतिशय दयनीय स्थिती बीड शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप निता अंधारे यांनी केले बीड हे कचऱ्याच्या उकाड्यांचे शहर बीड शहर बचाव मंचाच्या समन्वय समितीचे अनेक सदस्य गेल्या काही दिवसांपासुन बीड शहरांमध्ये सर्वत्र ठिकठिकाणी जाऊन पाहणी व दौरा करत आहेत व लोकांशी संवाद करत आहेत. शहरांमध्ये गल्लोगल्ली सर्वत्र, जिकडे पहावे तिकडे नजर जाईल तिथे घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा व रोगराईचा व साथीच्या रोगांचा सामना करावा लागत आहे. कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या बंद झाल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर" कचरा उचलणाऱ्या गाड्या व ट्रॅक्टर बंद केले आहेत. त्यातच मोकाट जनावरे व कुत्रे यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. चौका-चौकात, गल्लोगल्ली जिकडे पहावे तिकडे मोकाट कुत्र्यांचे व गुराढोरांचे कळपच्या कळप शहराच्या रस्त्यांवर सैर-वैर फिरत असतांना दिसत आहेत. वाहतुकीला व नागरी रहदारीला यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होतो आहे व त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी अपघात होऊन नागरिक गंभीररित्या जखमी होत आहेत. बऱ्याच नागरिकांना मोकाट जनावरांमुळे झालेल्या अपघाताने अपंगत्व येत आहे. ही वस्तुस्थिती आहे. विकासाच्या चाललेल्या या पर्वाने शहर अगदी हैरान व परेशान आहे. अशा प्रकारचे नगरपालिकेचे प्रशासन व कामकाज तुलनात्मक दृष्ट्या जगात कोठेही नाही. नगरपालिकेची यंत्रणा, प्रशासन व याला चालवणाऱ्या निताअंधारे या नागरिकांचा जाणीवपूर्वक सूड घेत आहेत. अंधारे ताईंनी त्यांच्या नावाला शोभेल असा शहराच्या सर्व विस्तारीत भागांमध्ये अंधार केला आहे. स्ट्रीट लाईट्स बंद स्थितीत आहेत. महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांना अंधारामुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. बीड शहरांमधील पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णतः विस्कळीत झालेली आहे. गेल्या एक महिन्यापासून अनेक भागांमध्ये नागरिकांना एक थेंब भर ही पिण्याचे पाणी मिळालेले नाही. तळ्यात मळ्यात सगळीकडे पाणी असूनही नीताताई अंधारे यांच्या वतीने नागरिकांसाठी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्यात येत आहे. 'नीता ताईंचं' करावं तेवढं कौतुक कमीच आहे. खरंचच या आपल्या बीड शहरामध्ये नागरिकांसमोर अडचणी निर्माण करण्यामध्ये त्यांनी केलेले योगदान अविस्मरणीय आहे व ते कधीही विसरता येणार नाही.
       विधानसभा निवडणुकीच्या आधी बीड शहर बचाव मंचाने बीड शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधांच्या विषयी जो त्रास सहन करावा लागत आहे,नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे प्रचंड संताप पसरलेला आहे,या सर्व बाबींवर सर्व स्तरातून अभ्यासपूर्ण जागृती करून सर्व नागरी समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले होते. सी.ओ निताताई अंधारे यांच्या तात्काळ बदलीची मागणी केली होती. ती अद्यापही झालेली नाही. अनेक समस्या व कामांविषयी निवेदने देऊन कामे चालू करण्यास भाग पाडले होते.निवडणुका आल्या होत्या म्हणून तेवढ्यापुरते मलमपट्टीचे काम काही दिवस नगरपालिकेने केलेले दिसते. परिस्थिती परत जैसे थे झाली आहे म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षाही बत्तर झालेली दिसते. आता काही पर्यायच उरलेला नसल्यामुळे बीड शहरातील नागरिक संतापाने तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बातमी वाचूनही प्रशासनाला जाग येईल का नाही हाही एक प्रश्नच आहे. झोपलेल्या व्यक्तीला जाग करता येत पण झोपेचे सोंग घेतलेल्या व्यक्तींना कसं जाग करणार ? बीड शहरात खंडित झालेली पाणीपुरवठा योजना, साफसफाई मोहीम,स्ट्रीट लाईटची समस्या,मोकाट कुत्रे व गुरेढोरे जनावरांची समस्या तसेच आम्ही वेळोवेळी जाणीव करून दिलेल्या इतर अनेक नागरी समस्या यावर प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घ्यावी व उपाययोजना कराव्यात असे आवाहन बीड शहर बचाव मंचाच्या वतीने बीड जिल्हा प्रशासनाला व नगरपरिषद प्रशासनाला करण्यात येत आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी