{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
शेवगाव : या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव तालुक्यातील बालमटाकळी येथील भारतीय जनता पार्टीचे विद्यमान तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांनी शनिवार दि. १८ रोजी भा.ज.प.चे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याकडे आपला तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती दिली आहे. तुषार वैद्य यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी मला शेवगाव तालुका भा.ज.पा. अध्यक्ष या पदाची जबाबदारी दिली होती. दिलेल्या पदाचा मी पक्ष वाढीसाठी माझ्यापरीने प्रयत्न केला दरम्यानच्या काळात लोकसभेसाठी गावोगाव जाऊन पक्षाचे विकास कार्य व लोक प्रतिनिधींची विकास कामे सांगून लोकांपर्यंत पोहचवण्याच काम केले. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान आमदार मोनिकाताई राजळे व त्यांचे समर्थक यांच्या विचारांच्या मतभेदामुळे मी व आमची कार्यकारिणी प्रचारादरम्यान सहभागी झालो नाही. कारण शेवगाव तालुका भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी मागील ३० ते ३५ वर्षाचा इतिहास पाहीला तर माझे वडील स्व. शिवनाथ अण्णा वैद्य यांनी त्यांच्या अनेक सहकान्यांना बरोबर घेऊन लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. दिलीप गांधी यांच्या नेतृत्त्वात शेवगाव तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी अतिशय कष्ट घेतले. तसेच बालमटाकळी मधील अनेक सहकाऱ्यांच्या
माध्यमातून जुन्या नव्याचा नव्याचा मेळ बसेना तालुक्यात प्रस्थापीतांच्या विरोधात पक्ष संघटना वाढवीली हे करत असताना फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. पाथर्डी- शेवगाव विधानसभा मतदार संघ असताना ज्या वेळेस स्व. दगडू पाटील बड़े प्रथम भाजपचे आमदार म्हणून निवडून आले त्या वेळेस शेवगाव तालुका भाजपा संघटना वाढीसाठी त्यांनी देखील स्व. आण्णाणां मोलाचे सहकार्य केले. तसेच स्व. तुकाराम गडाख व ऍड. प्रतापराव ढाकने यांचे देखील सहकार्य लाभले दरम्यानच्या काळात कित्येक नेते पक्षात आले नी परत गेले परंतु स्व. शिवनाथ अण्णा व त्यांच्या सहकार्यांनी पक्ष संघटनेचा विचार सोडला नाही. त्यांचे निधन एप्रिल २००८ मध्ये झाले. नंतर मला पक्षाने २००९ ला युवमोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व नंतर २०१० ते २०१६ पर्यंत दोन वेळा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाने मला दिली. नंतर मी देखील माझ्या परीने अगदी प्रामाणीकपणे पक्षनीष्टा जोपासून सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढीसाठी अनेक ठिकाणी शाखा उघडण्यात आल्या नवीन कार्यकर्ते संघटीत केले. २०१४ ला प्रतापराव ढाकणे लोकसभे दरम्यान पक्ष सोडून गेले तरी देखील तालुकस्तरीय मोठे नेतृत्व नसताना मी व माझ्या अनेक सहकऱ्यांनी पक्षाचाच विचार कायम ठेऊन पक्षासाठीच काम करायचे ठरवले. २०१४ विधानसभेसाठी आ. मोनिकाताईना पक्षाने संधी दिली, २०१९ ला दिली आम्ही प्रामाणीक काम केल. परंतु २०१४ ते २०२४ पर्यंत आमदार ताईचे कार्यकर्ते व जुनी भाजपा यांमध्ये पाहीजे तेवढे सौख्य राहीले नाही. आम्ही पटले नाही तरी पक्षाचा उमेदवार म्हणून काम केले परंतु स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसे की जी. प. पं. स. तसेच ग्रामपंचायत मध्ये राजळे गटाने जुन्या भाजपाला कायम विरोध केल्याचे निदर्शनास आले. तेव्हा या वेळी २०१४ ला विधानसभेच्या पक्षाच्या मुळ कार्यकर्त्याला म्हणजे अरुण भाऊ मुंढे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी असा आग्रह आम्ही म्हणजे जवळपास ८० % जुन्या भा. ज.पा. कार्यकर्त्यांनी धरला होता. परंतु त्याला यश आले नाही. पक्षाने मोनिकाताईंना उमेदवारी दिल्याने मागील १० वर्षाचा अनुभव पाहता आम्हाला मीळालेली वागणूक पाहता यावेळी आमच्या विचारांच्या लोकांनी मोनिकाताईचे काम करण्याची मानसीकता राहीली नव्हती. म्हणून मी व आमच्या विचारांच्या लोकांनी शांत बसण्याचा निर्णय घेतला होता. कारण आमदारांच्या कार्यकर्त्यांनी येथून मागे प्रमाणीकपणाने काम करून देखील आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळी तर आम्ही उघडपणे पक्षाकडे तिकीट बदलासाठी भूमीका घेतली होती. आम्ही जरी पक्षाचा उमेदवार या नात्याने काम केले असते तरी त्यांनी ते मान्य केले नसते म्हणून शांत बसलो विधानसभेला पक्षासाठी काम केले नाही. शेवगाव तालुक्यात पक्ष वाढीसाठी व निष्ठेसाठी अनेकांचे योगदान आहेच. परंतु वैद्य परिवाराचा सिंहाचा वाटा आहे. हे मी अभीमानाने सांगेल तेव्हा कोणत्या का होईना कारणास्तव मी पदावर असून देखील मी या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे काम न करता शांत बसलो. या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून व तसेच सध्याची राजकीय पद्धती व माझा स्वभाव पाहता मी माझ्या कडील भाजपा तालुका अध्यक्ष या पदाचा राजीनामा देत आहे. तो स्वीकारण्यात यावा. मी पक्षाच्या विचारांचा कार्यकर्ता म्हणून राहणे पसंद करेल. असेही दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी