असिटेक सोल्यूशन्स या कंपनीचे सर्वेसर्वा यांनी केली राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे 71 मोठ्या गुतंवणूकदारां विरोधात तक्रार


{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव तालुक्यातील रावतळे कुरुडगाव यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे नुकतीच ऑनलाइन दाखल केलेल्या तक्रारीवर त्वरित दखल घेण्यासाठी असिटेक सोल्यूशन्स या नावाने गेल्या तीन ते चार वर्षापासून एक प्रोप्रायटरशिप फर्म चालवत होतो. ज्यामध्ये माझ्या मार्फत काही लोकानी शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक केली होती ज्यावर अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून खूप चांगल्या प्रकारे परतावा देखील मिळवला आहे.
परंतु अनेक सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांनी देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात हवाला मार्फत रोख रक्कम त्यांच्या आणि इतर नातेवाईकांच्या नावाने गुंतवणूक केली. सदर गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या स्त्रोता विषयी असिटेक सोल्यूशन्स या कंपनीचे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याने तसेच गुंतवणूक करण्यात आलेल्या रक्कमेचा आकडा हा त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा खूप अधिक आढळून येत आहे. त्यामुळे मी उपलब्ध सर्व पुराव्यासाहित अश्या लोकसेवकांची माहिती ज्यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने बेनामी अश्या प्रकारची गुंतवणूक केलेली आहे गृह खात्याच्या ऑनलाइन तक्रार पोर्टल वर D.P.A.C. Dis Proportionate Assets Complaint या मध्ये दाखल केलेली आहे तसेच माझ्याकडे उपलब्ध असलेली सर्व कागदपत्रे असिटेक सोल्यूशन्स या कंपनीने संबंधीत पोर्टल वर अपलोड केलेले आहेत.
अनेक लोकसेवकानी आपण कर्तव्यावर असलेल्या ठिकाणी स्थानिक लोकांची बँक खाते वापरुन देखील व्यवहार केलेले आहेत त्यासंबंधी देखील स्पष्ट पुरावे असिटेक सोल्यूशन्स या कंपनीकडे उपलब्ध आहेत परंतु कोणतीही तक्रार न करण्यासाठी तसेच सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी कंपनीच्या संचालकांवर प्रचंड दबाव आणला जात आहे. तसेच खोटे गुन्हे दाखल करून साईनाथ कल्याण कवडे यास अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या जम्पनीने राज्याचे पोलीस महासंचालक यांना एका पत्राद्वारे विनंती केली आहे राज्याचे पोलिस महासंचालक यांनी प्राधान्याने असिटेक सोल्यूशन्स या कंपनीने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचा विचार करून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामधील तरतुदीनुसार संबंधित लोकसेवकांच्या जंगम स्थावर मालमत्ता व बेनामी संपत्तीची चौकशी करावी ही विनंती केली आहे तसेच सदर चौकशीत कंपनीकडून
 लागणारे सर्व सहकार्य करण्यास असिटेक सोल्यूशन्स या कंपनीचे संचालक तयार आहे. असे हमीपत्र जोडण्यात आले आहे




हे म्हणजे असं झालं मालकाचं कुत्रा काशीला आणि सर्वसामान्य गुंतवणुकदार फाशीला मी शेवगांवकर संघटना तालुक्यातील फसवणूक झालेल्या गुतंवणूकदारांना कानी कपाळी ओरडून सांगत होती पण कै जण सर सर करण्यात व्यस्त होते आता घ्या बाबाजी का ठुल्लू



Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी