26 जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन करणार -नगरसेवक ॲड जोगदंड,वाघमारे
बीड (प्रतिनिधी) 20 जानेवारी
शहरातील नागरिकांना विविध नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे स्वच्छतेच्या बाबतीत विशेष अपयशी ठरलेल्या बीड नगर परिषदेत कोट्यावधीचा निधी गडप केला जात आहे
शासनाचा निधी विकास कामावर खर्च न करता स्वतःचे घर भरणाऱ्या
बीड नगर परिषदेतील काही कर्मचारी, व कंस्ट्रक्शन यांनी संगनमत करून कोट्यावधी रुपयांचा अपहार केला आहे ही अतिशय गंभीर बाब असून
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 19 कामांची
सखोल चौकशी करून
संगनमताने रक्कम 2,59,99,736 /-
अक्षरी,दोन कोटी एकोणसाठ लक्ष नव्यान्नव हजार सातशे छत्तीस रु शासकीय
निधी लाटत
भ्रष्ट कारभार करणाऱ्या बीड नगर परिषदेतील दोषी कर्मचारी, कंस्ट्रक्शन सह संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी या बाबत मा. नगरसेवक ॲड विकास जोगदंड तसेच मा. नगरसेविका सौ पुजाताई गणेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी बीड यांचेकडे दिनांक 13 जानेवारी रोजी तक्रार/ निवेदन दाखल केले आहे
परंतु आठ दिवसाचा कालवधी लोटला तरी देखील अद्याप पर्यंत तक्रार,निवेदनावर कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याने दिनांक 26 जानेवारी पासून लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा नगरसेवक ॲड विकास जोगदंड
नगरसेविका सौ पुजाताई गणेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.!
Comments
Post a Comment