पाटोदा तालुक्यातील मंझरी (घाट) जलजीवन योजनेंतर्गत कामाच्या चौकशीसाठी दोन दिवसांपासून ग्रामस्थांचे उपोषण सुरू ; आधिका-यांचे दुर्लक्ष


पाटोदा:- ( दि.१७ ) पाटोदा तालुक्यातील मंझरी ( घाट) येथील ग्रामस्थ जलजीवन योजनेंतर्गत ६७ लक्ष रूपये कामाच्या निकृष्ट दर्जाचे व रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे यासाठी २ दिवसांपासून ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले असुन २ दिवसात जलजीवन आधिका-यांनी उपोषणाची दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना विनंती केल्यानंतर डॉ.गणेश ढवळे यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेत राजेंद्र मोराळे प्रकल्प जलजीवन मिशन जिल्हा परिषद बीड यांच्याशी फोनवरून संवाद सांधत ग्रामस्थांची कैफियत मांडली. राजेंद्र मोराळे यांनी संबंधित उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उप विभाग पाटोदा कुलकर्णी यांना फोन करून आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या ऐकून निराकरण करण्यात येईल असे डॉ.गणेश ढवळे यांच्याशी बोलताना सांगितले.
सविस्तर माहितीस्तव 

पाटोदा तालुक्यातील ६५० लोकसंख्या असलेल्या मंझरी ( घाट) गावातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत २ वर्षांपूर्वी ६७ लाख रुपये मंजूर झाले. गेल्यावर्षी पावसाळ्यात गावातील सिमेंट रस्ते खोदून निकृष्ट दर्जाचे पाईप टाकण्यात आले. विहिरीचे काम करण्यात आले नाही. टाकीचे काम निकृष्ट असुन पाणी मारले नाही. योजना अपुर्ण असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. वर्षभरापासून कंत्राटदार व अधिकारी यांना काम पूर्ण करण्याचे लेखी निवेदन देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर कडाक्याच्या थंडीत बेमुदत उपोषण सुरू केले असुन आज दुपारपर्यंत कोणत्याही आधिका-याने उपोषणाला भेट दिली नाही. यावेळी आंदोलनात प्रकाश नांदे, बाजीराव गिते, आकाश नांदे, पोपट शिंदे, प्रल्हाद भांबे,संदिप गिते, ईश्वर नांदे, महादेव भांबे, प्रकाश गिते,संजय गिते संगीत नांदे, श्रीराम नांदे, महादेव नांदे, लक्ष्मण नांदे आदी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी