आसरडोह ओबीसी घरकुलात मोठा भ्रष्टाचारचौकशी करून गुन्हा दाखल करा,अन्यथा अमरण उपोषण-अरुण तोडकर
बीड - धारूर तालुक्यातील आसरडोह येथे ओबीसी प्रवर्गातील घरकुलामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून गावचा ग्रामसेवक पंचायत समीतीचा इंजिनियर आणि विस्तार अधिकारी यांनी संगनमत करून घरकुलांचे कसलेही बांधकाम न करता मलीदा लाटला आहे
गटविकास आधिकारी पंचायत समिती धारूर यांना दिलेल्या लेखी निवेदनात अरुण तोडकर यांनी म्हटले आहे कि, ओबीसी घरकुलांचे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दोन दोन हप्ते जमा झाले खरे मात्र त्यांनी कुठल्याही घरकुलाचे कसलेही बांधकाम केलेले नाही तरीही त्यांच्या खात्यात हप्ते जमा झाले कारण प्रत्येक हप्त्या पोटी लाभार्थ्याकडून पाच पाच हजार रुपये घेतल्या मुळे असरडोह येथे हा चमत्कार घडु शकला आणि सरकारी अधिकाऱ्याच्या खाबुगीरी मुळे घरकुलांचे बोगस हप्ते लाभार्थ्यांना मिळाले, ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून ग्रामसेवक व पंचायत समितीच्या इंजिनियर व इतर आधिकाऱ्यामुळे शासनाच्या घरकुल योजना उद्देशाला काळीमा फासला गेला आहे शेकडो घरकुलात प्रतिहप्ता पाच हजार या प्रमाणे आसरडोह येथे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला असून या गंभीर प्रकरणाची चौकशी करून संबंधित भ्रष्ट आधिकाऱ्यावर योग्य ती उचित कारवाई करावी अन्यथा मी दि 26 जानेवारी २० 25 रोजी आत्मदहन करील असा इशारा निवेदनातून अरुण तोडकर यांनी दिला आहे असा कुठला अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मा गटविकास आधिकारी धारूर यांची राहिल.
Comments
Post a Comment