भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी ब सरपंच संतोष देशमुख यांच्या मुत्यू प्रकरणी घाटनांदूर कडकडीत बंद
बीड (सखाराम पोहिकर ) बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे सर्व प्रथम परभणी पोलिसाच्या कस्टडीत मृत्यू पडलेले सोमनाथ सुर्यवंशी व मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना घाटनांदूर येथील ग्रामस्थाच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली ब परभणी येथे भारतीय सविधानाच्या प्रतिआकृतीची तोडफोड केल्यानंतर रस्त्यावर उतरलेल्या आंदोल आंदोलन कर्त्या आंदोलन कर्त्याची पोलिसांनी धरपकड केली होती . यातील सोमनाथ सुर्यवंशी यांचा परभणी पोलिसांच्या कस्टडीत अमानुषपणे केलेल्या मारहाणीमूळे मृत्यू झाला होता शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी व मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यास घाटनांदूर येथे भावपूर्व श्रध्दांजली वाहण्यात आली दिव्यांगत सोमनाथ सुर्यवंशी युवक हा एल एल बी च्यामत शिकत होता परशणी येथे जातीवादी प्रवृत्तीच्या व्यक्तीने भारतीय संविधानाच्या प्रति आकृतीची तोडफोड केल्यानंतर आंबेडकर प्रेमीच्या वतीने परभणी शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनात सहभागी झाला म्हणून सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी याला परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यांचा परभणी पोलिसांच्या कस्टडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे तसेच परभणी पोलिसांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे 800 ते 900 लोकांवर गुन्हा दाखल झालेले आहेत त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत आशी मागणी ही होत आहे तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचाही भर दिवसा अपहरण करून मारण्यात आले मारेका यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे मागणी नागरिकांची या आंदोलनात मागणी होती हा मोर्चा तथागत चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा होता छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली भीमसैनिकांनी अंबाजोगाई पोलिस ग्रामीणला निवेदन देऊन घाटनांदूर हे गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले होते सर्व गावकरी या बंदमध्ये सामील झाले होते
Comments
Post a Comment