राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जनरल सेक्रेटरी भारत लाल यांच्या हस्ते कडूदास कांबळे दिल्लीत सन्मानित
दिल्ली ( विशेष प्रतिनिधी ) दि. १९ डिसेंबर २०२४ -
आझाद क्रांती कामगार युनियनचे अध्यक्ष कडूदास कांबळे यांचा देशाच्या राजधानीत विश्व युवक केंद्र दिल्ली येथे १८ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जनरल सेक्रेटरी भारत लाल यांच्या हस्ते तर पोपुलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या एक्झॅक्टिव्ह डायरेक्टर पूनम मुत्रेजा, मेंबर ऑफ पार्लमेंट संजना जाटव, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अमरजीत कौर, ॲक्शन एड असोसिएशनचे एक्झिटिव्ह डायरेक्टर संदीप चाचरा यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये सन्मान करण्यात आला.
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कामगारांना तसेच वंचित समूहांना त्यांचे न्याय हक्क आणि अधिकार मिळवून देण्याची भूमिका योग्य पद्धतीने बजावत असल्याबाबत हा सन्मान करण्यात आला. यापुढेही सर्वांच्या भल्यासाठी सामूहिकपणे सामाजिक कार्याची धुरा आपण सांभाळण्यास सक्षमपणे काम करावे त्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
सामाजिक न्यायाची लढाई लढत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सक्षमपणे कडुदास कांबळे यांना साथ देणाऱ्या मानवी हक्कासाठी जमिनीवरची लढाई लढणाऱ्या राधिकाताई चिंचोलीकर (हिंगोली), समीक्षा गणवीर (नागपूर), शेख शबाना (सांगली) या रण रागिणी सन्मान स्वीकारत असताना सोबत होत्या. हा सन्मान माझा वैयक्तिक नसून वंचित समूहांना न्याय देण्यासाठी ताकत देणाऱ्या त्या सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांचा आहे अशा भावना यावेळी कडुदास कांबळे यांनी व्यक्त केल्या.
मानवी अधिकाऱ्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन १७ आणि १८ डिसेंबर रोजी विश्व युवक केंद्र, त्रिमूर्ती मार्ग, चाणक्य पुरी नवी दिल्ली येथे ॲक्शन एड असोसिएशन संस्थेने आयोजित केले होते. देशातील संपूर्ण राज्यातून प्रमुख कार्यकर्ते या अधिवेशनासाठी उपस्थित होते. या विचार मंचावर अनेक कार्यकर्त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
मानव अधिकारासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी ॲक्शन येड असोसिएशन संस्थेचे तनवीर काझी, मनीषा भट्ट, सुभाष कुमार, दिपाली शर्मा, हिरा, जवान सिंग, मसूद, सायन कोंगारी, नारायणज्योती भुयान, देबारात पत्रा, मशकूर आलम, खलिद चौधरी, पंकज कुमार, राघव यांनी विशेष परिश्रम घेतले.
समारोपाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा आणि रश्मी यांनी केले.
Comments
Post a Comment